साकोली येथे योगाचे महत्त्व या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:16+5:302021-06-25T04:25:16+5:30

त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्जुनसिंग राणा, मुख्य मार्गदर्शक डॉ. विक्रम सिंग, डॉ. सुधीर कुमार शर्मा उपस्थित होते. योगा ...

National Seminar on the Importance of Yoga at Sakoli | साकोली येथे योगाचे महत्त्व या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

साकोली येथे योगाचे महत्त्व या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

googlenewsNext

त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्जुनसिंग राणा, मुख्य मार्गदर्शक डॉ. विक्रम सिंग, डॉ. सुधीर कुमार शर्मा उपस्थित होते. योगा आणि शारीरिक व्यायाम नवीन अभ्यासक्रमांमध्ये असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्जुन सिंग राणा यांनी केले. डॉ. विक्रम सिंग यांनी आसन करताना एकाग्रतेने केल्यास भरपूर फायदा मिळेल, असे प्रतिपादन केले. डॉ. सुधीर कुमार शर्मा यांनी, योगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतात. त्याचा फायदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतो, असे सांगितले. अतिथींचा परिचय डॉ. सुनीलकुमार चतुर्वेदी यांनी केले. डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर, संचालन रजनी गायधने यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्राचार्य घनश्याम निखाडे, राकेश चकोले, प्रा. देवेंद्र इसापुरे, कार्यकारी प्राचार्य अनिल गायकवाड, प्राचार्य खेमराज राऊत, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. राजकुमार भगत, अरुण उपरीकर, विनोद गणवीर, पुकराज लांजेवार, मिथुन कुमार, शाहीद सैयद प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: National Seminar on the Importance of Yoga at Sakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.