राष्ट्रवादी काँगेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:02 AM2018-09-07T01:02:56+5:302018-09-07T01:03:34+5:30
पसंत असलेल्या मुलीला पळवून आणेन असे व्यक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा यासह अन्य मागण्यांसाठी मोहाडी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : पसंत असलेल्या मुलीला पळवून आणेन असे व्यक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा यासह अन्य मागण्यांसाठी मोहाडी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
भाजपाच्या आमदारांनी मुलीचे अस्तित्व, त्यांचे अधिकार, स्वातंत्र्याची गळचेपी केली. त्यांचा संताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त करुन निषेध व्यक्त केला. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल बावनकर, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, तालुका अध्यक्षा वासुदेव बांते, विठ्इल काहलकर, राजु माटे, संगिता सुखानी राजु कारेमोरे, विजय पारधी, मनिषा गायधने, रिता हलमारे यांनी केले.
यावेळी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, राशन दुकानात आधार पडताळणी हाताच्या ठशाऐवजी डोळ्याद्वारे करावे, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचे राशन वाढविण्यात यावे, घरगुती वीजेचे बिल कमी करा, शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करा, शेतीला २४ तास वीजपुरवठा करा, धानाला तीन हजार प्रतिक्विंटल भाव द्या, भेल कंपनी सुरु करा, सनफलॅग कंपनीचे वाढीव प्रकलपाचे काम सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांची जमीन परत करा, शेतीतील माती उपसा करण्याची रायल्टी रद्द करा, जलशिवार योजनेतील तलावाचे गाळ ग्रामपंचायतद्वारे करावे, सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्रिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ डॉक्टर व परिचारीकांची पदे भरा आदी मागण्यांचे निवेदन प्रधानमंत्र्यांच्या नावे तहसिलदार यांना देण्यात आले.
यावेळी गोपीचंद ठवकर, हरिश्चंद्र कातोरे, धनराज ठवकर, खुशाल कोसरे, बबलू सय्यद, पुरुषोत्तम पातरे, आनंद डोहळे, कृष्णा क्षिरसागर, आनंद मलेवार, छोटूलाल मिरासे, मंजूळा भानारकर, कौशल्या निखारे, लिलाधर ढेंगे, सदाशिव ढेगे, चंद्रकुमार सेलोकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.