पीक कर्जवाटपात यंदाही राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:51+5:302021-05-30T04:27:51+5:30

आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...

Nationalized banks withdrew from crop lending this year as well | पीक कर्जवाटपात यंदाही राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या

पीक कर्जवाटपात यंदाही राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या

googlenewsNext

आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३९ हजार ४६७ शेतकऱ्यांना २०९ कोटींचे वितरण करण्यात आले. विदर्भ, कोकण बँकेला ३६ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १०३१ शेतकऱ्यांना ८० कोटी १ लाख म्हणजे २२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील खासगी बँकांना १९ कोटी ३८ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १२५ शेतकऱ्यांना एक कोटी ८७ लाखांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या १० टक्के कर्ज वितरण झाले आहे.

दरवर्षी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरित करताना नकारघंटा देतात, असा अनुभव आहे. ऐनवेळेपर्यंतही कर्ज दिले जात नाही. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांना १२८ कोटी नऊ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ४८८ शेतकऱ्यांना ३६ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांचे वारंवार उंबरठे झिजवावे लागत आहेत.

बाॅक्स

केवळ चार बँकांनीच केले कर्ज वितरण

जिल्ह्यात २२ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यापैकी ११ बँकांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, यापैकी केवळ बँका ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेने कर्ज वितरित केले आहे. इतर सात बँकांनी तर अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याला कर्जाचे वितरण केले नाही. बँक ऑफ इंडियाला ३१ कोटी १६ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २५५ शेतकऱ्यांना एक कोटी ६३ लाख ५१ हजारांचे कर्ज वितरित केले. बँक ऑफ महाराष्ट्रने १५ कोटी २६ लाख उद्दिष्टांपैकी एक कोटी ५५ लाख, पंजाब नॅशनल बँकेने ७० लाख उद्दिष्टापैकी २१ लाख आणि युनियन बँकेने आठ कोटी ८० लाख उद्दिष्टांपैकी २३ लाख दोन हजार रुपयांचे वितरण केले आहे.

बॉक्स

बँक उद्दिष्ट वितरण टक्केवारी (आकडे लाखात)

जिल्हा मध्यवर्ती बँक २८०७७८ २०९५० ७५

विदर्भ कोकण बँक ३६७५ ८०१ २२

राष्ट्रीयीकृत बँका १२८०९ ३६३ ०३

एकूण ४६५०० २२३०१ ४८

Web Title: Nationalized banks withdrew from crop lending this year as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.