विद्यार्थ्यांनी रेखाटले निसर्ग चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:35 AM2021-05-23T04:35:22+5:302021-05-23T04:35:22+5:30
पालांदूर : पर्यावरण संरक्षणासाठी सदैव झटणारे ज्येष्ठ गांधी विचारांचे पुरस्कर्ते आणि चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच कोरोना ...
पालांदूर : पर्यावरण संरक्षणासाठी सदैव झटणारे ज्येष्ठ गांधी विचारांचे पुरस्कर्ते आणि चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच कोरोना आजाराने निधन झाले. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून वर्ग आठ च्या विद्यार्थ्याने नैसर्गिक चित्र काढत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ही बाललीला या वर्ग ८ चा असित पृथ्वीराज मेश्राम राहणार खराशी तालुका लाखणी यांनी रेखाटलेली आहे.
विद्यार्थी जीवन हे अनमोल आहे. विद्यार्थी जीवनात बाल मनावर घडलेले सुंदर विचार उभ्या आयुष्यात प्रेरणादायी ठरतात. सुंदरलाल बहुगुणा या निसर्गप्रेमीचे निधन होताच त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी निसर्गप्रेमी सरसावलेले आहेत. निसर्ग अनमोल वचन त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वांचीच आहे. हे पटवून देण्याकरिता अख्खं आयुष्य खर्ची घालणारे सुंदरलाल जरी आज आपणात नसले तरी त्यांचे कर्तृत्व महान असल्याने ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. याची झलक पालांदूर जवळील खराशी येथील असित पृथ्वीराज मेश्राम या ८ व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगल्भ विचाराच्या भरोशावर नैसर्गिक चित्र रेखाटत सुंदरलाल बहुगुणा यांना विनम्र अभिवादन केले.