कोका अभयारण्यात आले जत्रेचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:49+5:302021-08-19T04:38:49+5:30
भंडारा येथून जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावर कोका अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली ...
भंडारा येथून जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावर कोका अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली होती. या अभयारण्यामध्ये राज्यमार्ग गेल्याने ते बंद करता येत नसल्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना अभयारण्यात अडवता येत नाही. या संधीचा फायदा घेऊन अनेक जण टेकेपार मार्ग कोकापर्यंत व परत सर्पेवाडा, माटोरा येथून परत गेला असल्याने अभयारण्याला वळसा घालता येत आहे. त्यामुळे या मार्गावरून स्वातंत्र्यदिनी दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत होती. नागरिकांना सांभाळण्यासाठी अभयारण्यातील कर्मचाऱ्यांना दिवसभर ड्युटीवर राहून ठिकठिकाणी रस्त्यावर वन मजुरांना लावण्यात आले होते. अभयारण्याऐवजी हे जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले तर अनेकांच्या फायदा होऊन या अभयारण्यामध्ये असलेल्या गावकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. तसेच कर्मचाऱ्यांवर पडलेला ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे हे अभयारण्य बंद करून त्याऐवजी उद्यान सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.