निसर्गाने झोडपले, किडींनी संपविले धानपिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:39 PM2017-10-28T23:39:52+5:302017-10-28T23:40:37+5:30
अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते. त्यात पुन्हा भर म्हणजे उभ्या पिकाला लागलेली अगणित किड यामुळे येथील बळीराजा पुन्हा 'घायाळ' झालेला दिसतो. जखमेवर मिठ चोळण्याचे काम निसर्गाने केले आहे. सगळीकडे शेतकरी हाहाकार करीत असतानाही मात्र कुठलेही अधिकारी किंवा कर्मचारी पिक पाहणीला आले नाही. त्यामुळे शेतकºयांत कृषी विभागाविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे.
अड्याळ आणि परिसरातील शेतकºयांच्या शेतात कशा पद्धतीचे पीक आहे हे तरी अधिकाºयांना माहित राहणार तरी कसे. कारण सुट बुटातील एसी गाडीतील आधिकाºयांना फार कमी शेतकरी ओळखतात. शेतातील पीक कापण्यापेक्षा जाळलेला बरा असेही शेतकरी म्हणतात. शेतातील सोनपिकाची राखरांगोळी जर होत असेल तर काय करावे त्या शेतकºयांनी, शेतातील शेतपिकाचा अड्याळ व परिसरातल शेकडो ग्रामस्थांनी पिकविमा काढला. त्याचा आता उपयोग होणार नसेल तर काय उपयोग त्या पिकविम्याचा.
यावर्षी अड्याळ व परिसरातील शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी संकटात आले. त्यात एका पाण्याची कमतरता, रोगाची लागण, निसर्गाची अवकृपा अणि किडनाशक औषधी फवारणीला रक्कमेची कमतरता अशा एक ना अनेक कारणांनी येथील शेतकरी हवालदिल झाला आहे, मात्र शासन- प्रशासनाला जाग येत नाही म्हणजे काय, शेतकºयाच्या हिताच्या बाता सांगणारे, लढा देणारे, मोर्चे काढणारे, स्वत:ला शेतकºयाचे हितचिंतक म्हणवणारे नेते, कार्यकर्ते मंडळी आता आहेत तरी कुठे?
अड्याळ व परिसरातील शेतकरी दरवर्षी पिकविमा काढतात. आता उभ्या सोन्यासारख्या पिकाची दुर्दशा झाली आहे. पिकविमा घेणारे मात्र गप्प आहेत, मग त्या शेतकºयांनी करायचे तरी काय, पिकविमा काढला तरी एखादीवेळीच कवडीमोल मोबदला मिळतो. त्यानंतर शेतकºयांना पिकविमा रक्कम भरायची सक्ती कशाला, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अड्याळ मधून यावर्षी अड्याळ आणि सालेवाडा येथील अंदाजे ६५० शेतकºयांकडून पिकविमा घेण्यात आला आणि यापैकी अंदाजे ८० टक्के शेतकºयांचे धानाची फसल विविध कारणांनी गेल्याची ओरड गावात आहे. पिकविमा काढला तर आता त्या पिकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे की नाही, असा सवाल येथील शेतकरी करताना दिसत आहे.
गावातील शेतकºयांकडून प्रति एकर ३०० ते ३५० रूपये कर्ज घेणाºया प्रत्येकाला पिकविमा म्हणून रक्कम घेतली. कर्ज पाहिजे तर मग पिकविमा काढावाच लागेल आणि कर्ज घेणाºया प्रत्येक शेतकºयांनी तो काढला सुद्धा. आता वेळ आली आहे पिकविमा घेण्याची, परंतु पिकविमा मिळणार तरी कसा, शेतकरी सध्या एवढा हतबल आहे की दिवाळी विसरली आणि त्यात विरजन म्हणजे कोणाचीही साथ नाही, अशास्थितीत करायचे तरी काय?
शासन, प्रशासन संबंधित विभागाने आतापर्यंत पाहणी न करण्याचे कारण म्हणजे काय असणार, तापल्या तव्यावर पोळी शेकायला हजारो येथे म्हणतात, पण शेतकºयांचे दुर्देव असे की जेव्हा शेतकºयांवर वेळ येते तेव्हा भलतेच चित्र समोर येते. आतातरी जास्त वेळ घालवण्यापेक्षा अड्याळ व परिसरातील पिकांची पाहणी होणे गरजेचे आहे. नुसती पाहणी करूनही उपयोग नाही तर संबंधित शेतकºयांना पिकविम्याचा लाभ मिळावा, अशीही मागणी येथील शेतकºयांकडून होताना दिसत आहे. याविषयी गंभीर आणि खंबीर कोण भूमिका घेणार, याकडे आता अडयाळ व परिसरातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.