नवतपात भंडाराचा पारा ४७ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:11 AM2019-05-30T01:11:48+5:302019-05-30T01:12:07+5:30

उन्हाच्या तडाख्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने भंडाराचे कमाल तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. नवतपाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच बुधवारला भंडाराचा पारा ४७ अंशावर पोहचला. मंगळवारला पारा ४६ अंश नोंदविण्यात आले होते.

Navapurata Bhandara mercury at 47 degrees | नवतपात भंडाराचा पारा ४७ अंशावर

नवतपात भंडाराचा पारा ४७ अंशावर

googlenewsNext
ठळक मुद्देजनजीवन प्रभावित : हवामान खात्याने वर्तविला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उन्हाच्या तडाख्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने भंडाराचे कमाल तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. नवतपाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच बुधवारला भंडाराचा पारा ४७ अंशावर पोहचला. मंगळवारला पारा ४६ अंश नोंदविण्यात आले होते.
हवामान खात्याने विदभार्साठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे नवतपात जिल्हावासयिांची परीक्षाच होत आहे. उन्हाळ्याचे अखेरचे दिवस म्हणजे अंगावर काटा आणणारे ठरतात. याच दिवसात नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत.
नवतपा सुरू झाल्यापासून जिल्हावासियांची अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच गरमी जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. सोमवारी कमाल ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान २ अंशांनी अधिक होते तर किमान २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा मारा काही अंशी झालेली ढगांची गर्दी यामुळे उकाड्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण कोरडे झाले आहे. अजून आठवडाभर तापमान ४६ अंशांहून अधिकच राहील व उष्णतेची लाट कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. दरम्यान दिनांक पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वाºयासह पावसाच्या सरी बरसणार असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, मागील आठवडाभरात तापमानात दोन अंशांहून अधिक वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी ४५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने पारा चढत गेला. लोकसभा निवडणूकांच्या निकालांच्या दिवशी ४६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.
मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे शेतीकामे दुपारी ठप्प होत आहे. तापमानामुळे सकाळी ११ वाजतापूर्वीच शेतकरी आपली कामे आटोपून घराकडे परत येत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी शेतशिवारात शुकशुकाट दिसत आहे.

Web Title: Navapurata Bhandara mercury at 47 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.