सौर कृषिपंप देणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी

By admin | Published: November 19, 2015 12:18 AM2015-11-19T00:18:06+5:302015-11-19T00:18:06+5:30

औष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे.

Navsanjivan to give solar farming to farmers | सौर कृषिपंप देणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी

सौर कृषिपंप देणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी

Next

भंडारा जिल्ह्याला १९६ नगांचा पुरवठा : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना भरीव पुरवठा
मोहन भोयर तुमसर
औष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे. कृषिपंप सौर उर्जेवर शेतकऱ्यांना देण्याकरिता ऊर्जा विभागाने कंबर कसली असून राज्याला ७,५४० सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापैकी भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला १९६ नग आले आहेत.
केंद्र शासनाने राष्ट्रीयस्तरावर १ लाख नग सौरकृषिपंपाच्या योजनेसाठी ४०० कोटींची तरतुद केली आहे. राज्यासाठी वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये ३० टक्के प्रमाणे १३३.५० कोटी एवढे केंद्रीय वित्त सहाय्य उपलब्ध होणार आहे. नियमित विद्युत पुरवठा किंव विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. केंद्रीय अनुदान राज्याचे अनुदान व लाभार्थ्यांचा हिस्सा विचारात घेऊन सौर कृषिपंप देण्याची योजना तयार करण्यात आली. ५ एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ एच.पी. क्षमतेचे सौर कृषीपंप देण्याच्या योजनेस मान्यता मिळाली आहे. यात प्राधान्य अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत विहीरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील श्ोतकरी, महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित ग्राहकांपैकी तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा शक्य नाही, असे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून ठरविण्यात येईल. या योजनेचा लाभ व उद्दिष्ट हे केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार व उपलब्ध वित्तीय सहाय्यावर अवलंबून राहणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा केवळ पाच टक्के राहणार असल्याने शेतकऱ्यांकरिता ही योजना नवसंजिवनी ठरली आहे.

Web Title: Navsanjivan to give solar farming to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.