राष्ट्रवादी काँग्रेस हा गट नव्हे तर पक्ष, शरद पवार हे आमचे नेते - प्रफुल्ल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 12:48 PM2023-08-24T12:48:07+5:302023-08-24T12:49:15+5:30
फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारधारेत तडजोड नाही
भंडारा : आम्ही निर्णय घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा गट नाही तर पक्ष आहे. बहुतांश आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत. शरद पवार आमचे नेते असून पुढेही राहणार आहेत. पक्षाचा विचार तसेच फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारधारा घेऊन पुढे चालताना या विचारांशी तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
स्थानिक सभागृहात आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला आमदार राजेंद्र जैन, राजू कारेमोरे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जयंत वैरागडे, अभिषेख कारेमोरे, अविनाश ब्राह्मणकर, देवचंद ठाकरे, सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, महेंद्र गडकरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पटेल म्हणाले, भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांशी आपले कौटुंबिक नाते आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून विकासाची अनेक रखडलेली आहेत ती कामे पूर्ण होतील. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता यांच्या हिताची कामे सदैव करीत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांंनी उपस्थितांना केले.
मेळाव्याला लोमेश वैद्य, शेखर गभणे, श्रीकांत वैरागडे, नेहा शेंडे, राजेंद्र ढबाले, एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर, राजू देशभ्रतार, सुषमा पारधी, आनंद मलेवार, महादेव पचघरे, रजनीश बन्सोड, नंदा झंझाड, आशा डोरले, स्मिता डोंगरे, दीपलता समरीत, लता नरुले, रितेश वासनिक, नूतन कुर्झेकर, संजना वरकडे, निमाताई ठाकरे, आम्रपाली पटले, मीनाक्षी सहारे, मनोज झुरमुरे, भुजवंता धुर्वे, हिराचंद्र पुरामकर आदींसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पक्ष पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.