राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सर्वसामान्य जनतेशी जुळलेला पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:52+5:302021-06-28T04:23:52+5:30
भंडारा : आरक्षणासाठी जे आंदोलन करीत आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे की, कधीतरी ओबीसी समाजासाठी लाभाच्या दृष्टिकोनातून काम केले आहे ...
भंडारा : आरक्षणासाठी जे आंदोलन करीत आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे की, कधीतरी ओबीसी समाजासाठी लाभाच्या दृष्टिकोनातून काम केले आहे का? विरोध करायचा म्हणजेच समाजाची दिशाभूल करायची हे त्यांच्या कृत्यावरून दिसून येते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व सामान्य जनतेशी जुळलेला पक्ष आहे. आमचा पक्ष कसलीही दिशाभूल न करता व्यक्ती किंबहुना समाज संघटनांच्या पाठीशी उभा राहणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेसमोर विरोधकांचे पितळ उघडे पाडावे, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले. जे. एम. पटेल, महाविद्यालयाचा सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत ना. नवाब मलिक यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खा. मधुकर कुकडे, धंनजय दलाल, सुनील फुंडे, जयंत वैरागडे, यशवंत सोनकुसरे, सरिता मदनकर, स्नेहा शेंडे, सुनंदा मुंडले, राजू हाजी सलाम, परवेज पटेल, शाहजादभाई, राजू माटे, राहुल निर्वाण, नरेंद्र झंझाड, महेंद्र गडकरी, विनयमोहन पशिने, स्वप्नील नशीने आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले, विरोधक हे नेहमी खोटे पण रेटून बोलतात. याबाबत राकाँ कार्यकर्त्यांनी त्यांचे सत्य समोर आणले पाहिजे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेले कोविड १९ संक्रमणाच्या काळातील कार्य, शेतकऱ्यांना धानाला बोनस मिळवून देणे, यासारख्या अनेक जनहिताच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संगठण जिल्ह्यात मजबुतीने उभे करावे. पक्ष सदैव सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हे जनतेला पटवून द्यावे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी हिमांशू मेंढे, विकास गभने, लोमेश वैद्य, अंगराज समरीत, धनू व्यास, बालू चुन्ने, सदाशिव ढेंगे, योगेश वैद्द, सुरेश बघेल, बाळा गभने, प्रा. बबन मेश्राम, गणेश चौधरी, मनोज रहिल्यानी, संजय मिरासे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.