राष्ट्रवादी हा कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:31+5:302021-06-23T04:23:31+5:30

साकोली : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी कसोशीने प्रयत्न करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी, ...

The NCP is a party of hardworking, farmers and ordinary workers | राष्ट्रवादी हा कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष

राष्ट्रवादी हा कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष

Next

साकोली : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी कसोशीने प्रयत्न करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला उचित भाव मिळवून देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

येथील एम.बी. पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्ता व पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांसोबत विविध समस्यांवर चर्चा केली. खा.प्रफुल पटेल म्हणाले की, या भागाच्या विकासासाठी पक्ष सदैव कटिबद्ध आहे, यूपीए सरकारच्या काळात अनेक योजनांच्या माध्यमातून या भागाचा विकास केला. हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी भेल प्रकल्प आणण्याचे काम केले; पण त्यानंतर खोटी आश्वासने देऊन आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची एक वीटही हलवू शकले नाही. खोटे आश्वासन देणाऱ्या लोकांना निवडून देण्याचे काम आता करू नका व विकास कोण करू शकतो, याची ओळख करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मजबूत करण्याचे काम करावे.

यावेळी राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, नरेश माहेश्वरी, सुनील फुंडे, सरिता मदनकर, मदन रामटेके, सुरेश कापगते, प्रभाकर सपाटे, प्रदीपभाऊ मासूरकर, अंगराज समरीत, रामचंद्र कोहळे, सुरेश बघेल, अनिल टेंभरे, शैलेश गजभिये, प्रवीण भांडारकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, राजेश चांदवाणी, जया भुरे, भुमाला कुंभरे, ॲड. स्मिता मेश्राम आदी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. खासदार पटेल यांनी पुष्पगुच्छ व पक्षाचा दुप्पटा वापरून सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी निखिल जिभकाटे, मनीष कोटांगले, रजत कळसर्पे, विशाल वाघाडे, पंकज सपाटे, सलीम खान, कृणाल निंबेकर, गौरव भैसारे, स्वामी नेवारे, लाला उपाध्याय, पंकज झोडे, रिजवान सय्यद, आदित्य जिभकाटे, परेश चांदेवार, विशाल मडावी, संगम खांडेकर, प्रणय टेंभूर्णे उपस्थित होते.

Web Title: The NCP is a party of hardworking, farmers and ordinary workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.