राष्ट्रवादीने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:39 PM2017-11-08T23:39:50+5:302017-11-08T23:40:21+5:30
गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतलेला निर्णय देशाच्या दृष्टीने विनाशकारी ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतलेला निर्णय देशाच्या दृष्टीने विनाशकारी ठरला. नोटाबंदीमुळे गोरगरीब जनता, शेतमजूर, शेतकरी होरपळून निघाला. जी.एस.टी. मुळे छोटे उद्योग करणाºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे देशामध्ये बेरोजगारी वाढली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला.
नोटाबंदी व जीएसटीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष बाबूराव बागडे, सभापती नरेश डहारे, डॉ.श्रीकांत वैरागडे, डॉ.रविंद्र वानखेडे, गुणवंत काळबांडे, किरण कुंभरे, निलीमा गाढवे, प्रभू फेंडर, हेमंत महाकाळकर, हिमांशू मेंढे, आहुजा डोंगरे, उमराव सेलोकर, अरुण अंबादे, सुनिल घोगरे, विष्णू कढीखाये, लोकेश खोब्रागडे, अरविंद पडोळे, जुगल भोंगाडे, जुमाला बोरकर, उमेश ठाकरे, रुपेश खवास, अंकीत सार्वे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.