राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे

By admin | Published: April 19, 2017 12:26 AM2017-04-19T00:26:16+5:302017-04-19T00:26:16+5:30

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहाडी तर्फे शासनाच्या अन्यायकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालय मोहाडी समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

NCP's dam | राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे

Next

मोहाडीत आंदोलन : तहसीलदार यांना दिले निवेदन
मोहाडी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहाडी तर्फे शासनाच्या अन्यायकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालय मोहाडी समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, शेतीवरील कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रात दिलेला धान ५० क्विंटल ऐवजी संपूर्ण धानावर ५०० रुपये क्विंटल प्रमाणे बोनस देण्यात यावा, बावनथडी प्रकल्पाचे अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, रोहणा पॉवर प्लँट सुरु करण्यात यावा, अथवा शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात याव्या, तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, बाबा जुमदेवजी यांनी व्यसनमुक्ती अभियान राबविले व ते मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखविले. त्यामुळे त्यांच्या बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीप्रित्यर्थ ३ एप्रिल रोजी शासकीय सुटी जाहीर करण्यात यावी, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना ६०० रुपयाऐवजी १००० रुपये प्रती महिना देण्यात यावा, शेतकरी, भूमिहीन मजुरांना ६ हजार रुपये प्रती महिना मानधन देण्यात यावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मजूर उपलब्ध करून देण्यात यावे, पेंच प्रकल्पाचे पाणी सुर नदीला सोडण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले.
धरणे आंदोलनात मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वासुदेव बांते, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री नाना पंचुबुद्धे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले, श्रीधर हटवार, राजू कारेमोरे, विजय पारधी, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, रिता हलमारे, मनिषा गायधने, प्रमिला साकुरे, प्रदीप बुराडे, नरेश ईश्वरकर, कैलाश तितीरमारे, मुरलीधर फुलबांधे, मयूर ईश्वरकर, राजेश मते, रमेश कुंभारे, महादेव बांडेबुचे, महेंद्र बावने, वामन बोकडे, नवीन भैसारे, विनोद बाभरे, सुरेश रहांगडाले, राजेश ठाकरे, बाबूराव मते, उषा धार्मिक, संगीता सुखानी, शाम साठवणे, शामल गजभिये, अशोक मुटकुरे आदी शेकडो कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: NCP's dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.