राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
By Admin | Published: March 25, 2017 12:37 AM2017-03-25T00:37:30+5:302017-03-25T00:37:30+5:30
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात पार पडली.
भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात पार पडली.
यावेळी संघटनात्मक वाढ करण्याबाबत चर्चा करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून जिल्हा कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष हे तालुक्याचा दौरा करून पक्ष संघटना मजबुत करण्याबाबत ठराव घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी रहांगडाले, सुनंदा मुंडले, कल्याणी भुरे, अविनाश ब्राम्हणकर, अभिषेक कारेमोरे, धनु व्यास, उर्मिला आगाशे, पमा ठाकूर, तोमेश्वर पंचभाई, अंगराज समरीत, लोमेश वैद्य, बाबुराव मते, विनोद ढोरे, डॉ. प्रदीप वासनिक, एल.जी. भावे, किशोर चौधरी, संजय केवट यांनी पक्ष संघटना वाढविण्याबाबत विचार व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक विनयमोहन पशिने, मुकेश बावनकर, महेंद्र गडकरी, नरेंद्र झंझाड, सुमेध श्यामकुंवर, यादवराव भोगे, शैलेश मयुर, डॉ.श्रीकांत वैरागडे, हितेश सेलोकर, अनिल जैन, नितीन तुमाने, सुकराम चोपकर, धनंजय सपकाळ, अनिल जैन, नितीन तुमाने, सुकराम चोपकर, धनंजय सपकाळ, ज्योती खवास यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)