शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

By admin | Published: April 14, 2017 12:30 AM2017-04-14T00:30:21+5:302017-04-14T00:30:21+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तालुका, लाखनी शहर यांच्या वतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्ज माफ करा,

NCP's movement for farmers' demands | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

Next

मुख्यमंत्र्यांना निवेदन : शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती, घोषणाबाजीने परिसर दणाणला, नेत्यांनी केले मार्गदर्शन
लाखनी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तालुका, लाखनी शहर यांच्या वतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्ज माफ करा, ग्रामीण रूग्णालय लाखनी तसेच पालांदूर येथील दवाखान्यात सोयीसुविधा पूर्ण करा, लाखनी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करा अशा विविध मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय लाखनीसमोर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, नेते सुनिल फुंडे, धनंजय दलाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अभिषेक कारेमोरे, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, अविनाश ब्राम्हणकर, दामाजी खंडाईत, लाखनी तालुका अध्यक्ष विकास गभणे, नगर पंचायत उपाध्यक्ष धनू व्यास, बाळा शिवणकर, नागेश पाटील वाघाये, गुणवंत दिघोरे, महिला अध्यक्ष उर्मिला आगाशे, शशीकांत भोयर, उपसरपंच निलेश गाढवे, प्रशांत मेश्राम यांनी केले. आंदोलनादरम्यान नेत्यांची भाषणे झालीत. यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते. आंदोलनासाठी प्रशांत चाचाने, सुनिंल चाफले, विनोद आगलावे, सुधीर संदनवार, नितीन निर्वाण, राजेश राघोर्ते, मंदा गभने, डोलीराम झंझाड, आयशा बेगम, सुनिल भांडारकर, सुरेश बोपचे, रवी खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
लाखांदूर : भाजप सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. त्यांच्या विविध मागणी संदर्भात लाखांदूर तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनेतहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदार तोडसाम यांना निवेदन देण्यात आले. यात प्रमुख मागण्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यात यावा, विजेचे बिल कमी करावे, शेतकऱ्यांच्या विविध समस्या या सरकारने सोडविल्या नाही. जनतेला भुलथापा मारून शेतकऱ्यांची निराशा या सरकारने केली आहे. त्यामुळे विविध शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या धरणे आंदोलनात मांडण्यात आल्या. यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी व सातबारा कोरा करावा, उन्हाळी धानाला तीन हजार रूपये भाव देण्यात यावा व ५०० रूपये बोनस जाहीर करावा, ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, वीज बिल कमी करून भारनियमण बंद करावे, बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
लाखांदूर टी पॉइंट येथून तहसील कार्यालयापर्यंत संघर्षयात्रा काढण्यात आली. यात सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व राकाँ जिल्हा अध्यक्ष मधुकर कुकडे, जि.प. सभापती शुभांगी रहांगडाले, जिल्हा महासचिव धनंजय दलाल, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा महिला अध्यक्ष कल्याणी भुरे, जिल्हा महासचिव दिपक चिमणकर, राकाँ तालुका अध्यक्ष बालू चुन्ने, महिला अध्यक्ष कल्पना जाधव, वैशाली हटवार, उपसभापती देवीदास राऊत, नगरसेवक देवानंद नागदेवे, मोहन राऊत, शिलमंजू सिंव्हगडे, विनोद ढोरे, कांता मेश्राम, नरेश सोनटक्के, ईश्वर कुंभलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
साकोली : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, विजेचे बिल कमी करून भारनियमन बंद करावे, गॅसच्या किमती कमी कराव्या, ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, उन्हाळी धानाला तीन हजार रुपये भाव देण्यात यावे व ५०० रुपये बोनस जाहीर करावा, भेल प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु करावे व बेरोजगारासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या या मागण्यांचा समावेश आहे. या धरणे आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, सभापती नरेश डहारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, अविनाश ब्राम्हणकर, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, रामचंद्र कोहळे, कल्याणी भुरे, अभिषेक कारेमोरे, लता परसगडे, शैलेश गजभिये, सुरेश बघेल, हेमकृष्ण वाडीभस्मे, लता दुरुगकर, कौशल्याबाई नंदेश्वर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: NCP's movement for farmers' demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.