करडी परिसरात राष्ट्रवादीची मुसंडी, भाजपत निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:29+5:302021-02-14T04:33:29+5:30

करडी (पालोरा):- सरपंच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पांजरा येथे सत्ता बसविण्यासाठी नाट्यमय घडामोडी झाल्या. दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीवर बोरीगावचा प्रभाव होता. ...

NCP's Musandi in Kardi area, BJP disappointed | करडी परिसरात राष्ट्रवादीची मुसंडी, भाजपत निराशा

करडी परिसरात राष्ट्रवादीची मुसंडी, भाजपत निराशा

Next

करडी (पालोरा):- सरपंच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पांजरा येथे सत्ता बसविण्यासाठी नाट्यमय घडामोडी झाल्या. दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीवर बोरीगावचा प्रभाव होता. या निवडणुकीत प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडून आलेल्यांनी राजकीय मतभेद विसरून पांजरा गावाचा प्रभाव कायम राखला. सत्ताधारी व विरोधी गटातील प्रत्येकी दोन सदस्यांनी एकत्र सरपंच व उपसरपंचपद आपसात ठरवून सत्ता स्थापन केली. सरपंचपदी किरण शहारे, तर उपसरपंचपदी गौरीशंकर राऊत यांनी विजय मिळविला. सरपंचपदासाठी दोघांनी अर्ज भरले होते. शेवटच्या क्षणी रूपाली अनिल राऊत यांनी अर्ज मागे घेतल्याने सरपंचपदासाठी किरण सोमाजी शहारे यांची अविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठीसुद्धा दोन अर्ज होते. निवडणुकीत गौरीशंकर जयदेव राऊत यांना एकूण ७ पैकी ४ मते मिळाली तर रूपेश देवराम माटे यांना ३ मते मिळाली. गौरीशंकर राऊत यांचा विजय झाला. निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी बी. आर. भोयर व ग्रामसेविका गोकुळा सानप यांनी काम पाहिले. नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे कौतुक होत आहे.

बॉक्lबॉक्l

केसलवाडा येथे राष्ट्रवादीचा झेंडा

केसलवाडा ग्रामपंचायतीत भाजपला पराभूत करीत राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकाविला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ७ सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे ६, तर भाजपचा एकच सदस्य निवडून आला होता. येथे तरुणांची भूमिका निर्णायक राहिली होती. सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने अविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदी पूजा जनार्दन काळसर्पे तर उपसरपंचपदी राजेंद्र अनिराम शेंदरे यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तेलमासरे यांनी काम पाहिले.

बॉक्l

जांभोरा येथे सरपंच राष्ट्रवादीचा, तर उपसरपंच भाजपचा

जांभोरा गट ग्रामपंचायतीत भाजप समर्थित यादोराव मुंगमोडे गटाचे ११ पैकी ७ सदस्य निवडून आले होते. सत्ताधारी राष्ट्रवादी समर्थात भूपेंद्र पवनकर गटाचे ४ सदस्य निवडून आले होते. परंतु आरक्षण अनुचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने भाजप समर्थातील गटाला हादरा बसला. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकमेव अर्ज आल्याने राष्ट्रवादीच्या वनिता सत्यवान राऊत यांची अविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी दोन अर्ज होते. निवडणुकीत यादोराव मुंगमोडे यांना ७ मते मिळाली तर भूपेंद्र पवनकर यांना ४ मते मिळाली. यादोराव मुंगमोडे विजयी ठरले. मात्र, सरपंचपदी राष्ट्रवादीचा कब्जा झाल्याने भाजपत नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. आरक्षणाचा फटका भाजपला बसला.

बॉक्lबॉक्l

खडकीत राष्ट्रवादीचा सरपंच, तर भाजपचा उपसरपंच

खडकी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप समर्थित बाबू ठवकर गटाला ९ पैकी ५ जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी समर्थात देवाजी पचघरे गटाला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. परंतु सरपंच आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव आल्याने व राष्ट्रवादी गटाकडे एकमेव उमेदवार असल्याने सरपंचपदी अविरोध निवड होण्याची शक्यता होती. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकमेव अर्ज राहील्याने परमेश्वर बागडे यांची अविरोध निवड झाली, तर उपसरपंचपदासाठी बाबूजी ठवकर विजयी ठरले. बाबूजी ठवकर यांचे सरपंच होण्याचे स्वप्न आरक्षणामुळे भंगले.

Web Title: NCP's Musandi in Kardi area, BJP disappointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.