तुमसरात इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:23+5:302021-07-04T04:24:23+5:30
गत दीड वर्षांतल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे ...
गत दीड वर्षांतल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला खर्च कसा मिळवायचा ही समस्या लोकांसमोर आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकार रोजच इंधन, गॅस सिलिंडर व जिवनावश्यक वस्तुंची दरवाढ करत आहे. त्या विरोधात आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आले. तात्काळ दरवाढ कमी न केल्यास या पेक्षा ही उग्र आंदोलन करू, असा इशारा तहसीलदारांमार्फत प्रधान मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी माजी मधुकर कुकडे, प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, रायुकाँ तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, राजेश देशमुख, सुनील थोटे, शिशुपाल गौपाले, योगेश सिंगनजुडे, धनेंद्र तुरकर, सुरेश रहांगडाले, राजकुमार माटे, सलाम तुरक, मनोज वासनिक, डॉ. सचिन बावनकर, रामदास बडवाईक, शालीक गौपाले, अनिल टेकाम, प्रदीप भरनेकर, सुदिप ठाकुर, तिलक गजभिये, राजू देशभ्रतार, देवेन शहारे, प्रदीप लांजे, गोल्डी घडले, संकेत गजभिये, जाकीर तुरक, सुरेंद्र पाटील, अशोक बन्सोड, अतुल सार्वे, संदेश कुंभरे, उमेश बिंजेवार, रेखा ठाकरे, प्रेरणा तुरकर, पमाताई ठाकुर, सरोज भुरे, खुशलता गजभिये, जयश्री गभने, रहमताबि मिर्झा, मिना गाढवे, प्रतीक्षा कटरे, नेहा मोटघरे, उषा साखरवाडे आदी पदािधकारी कार्यकर्त्ये उपस्थित होते.