राष्ट्रवादीकडून ‘त्या’ घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:50 AM2018-04-18T01:50:45+5:302018-04-18T01:50:45+5:30
तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कथुआ व उन्नाव येथील नाबालीक मुलींवर झालेल्या अत्याचार विरोधात बावनकर चौक येथे निदर्शने करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कथुआ व उन्नाव येथील नाबालीक मुलींवर झालेल्या अत्याचार विरोधात बावनकर चौक येथे निदर्शने करण्यात आले.
कल्याणी भुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. शालेय युवतींनी व महिलांनी ‘मुझे भी जीने दो’ अशा आक्रोशामध्ये घोषणा दिल्या. उपस्थित मुलींनी, समाज विकृतीला असंख्य मुली बळी पडत आहे. कुठपर्यंत हे सहन करायचे का? मुलींना चांगल्या दृष्टीकोनातून बघत नाही. आता स्वत: मजबूत व्हा कोनाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत: लढायला सज्ज व्हा उठ आणि लढ या वाईट विकृती साठी आणि आपल्या बहिणीचे रक्षण सुध्दा तु स्वत: कर अशाही घोषणा देण्यात आल्या. माजी आमदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर , माजी नगरपरिषद अध्यक्ष विजय डेकाटे, यांनी सुध्दा निदर्शने करून आक्रोश व्यक्त केला.
यावेळी विठ्ठल कहालकर, राजू माटे, योगेश सिंगनजुडे, राजेश देशमुख, सलाम तुरक, तिलक गजभीये, अखिल रिझवी, संजय लाखा, सरोज भुरे, विजया चोपकर, कविता साखरवाडे, मीनाताई गाढवे, नुतनताई भोले, नंदा डोरले, आरती चकोले, जयश्री गभने, खुशलता गजभीये, रहमत बी. मिर्झा, बडवाईक, शोभाताई सहारे, सुश्मीता रामटेके आदी काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.