मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:33+5:302021-07-17T04:27:33+5:30
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमोरे, प्रदेश महासचिव जयंत वैरागडे, माजी खासदार मधुकर कुकडे, मोहाडी तालुकाध्यक्ष ...
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमोरे, प्रदेश महासचिव जयंत वैरागडे, माजी खासदार मधुकर कुकडे, मोहाडी तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, योगेश सिंगनजुडे, विठ्ठलराव कहालकर, प्रेरणा तुरकर, ठाकचंद मुंगुसमारे, श्वेता कहालकर देवचंद ठाकरे, मनीषा गायधने, रिता हलमारे, राजेंद्र मेहर, तारा हेडाऊ, डॉ.सचिन बावणकर, अनिल काळे, एकनाथ फेंडर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रातील सरकारने जनसामान्य मानसाचे कंबरडे मोडलेले आहे. केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे जनतेला जीवन जगणे हलाखीचे झालेले आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. तरुण नैराश्यात जीवन जगत आहेत. महागाईने कळस गाठलेला असून, शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी नष्ट झाल्या आहेत. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करा, खाद्यतेलाची दरवाढ कमी करा, इंधनाच्या लाकडाचे दरवाढ कमी करा, शेतकऱ्यांना शेतोपयोगी यंत्रसामुग्री तीन टक्के राष्ट्रीयकृत बँकाकडून यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात यावी, धानाचे हमीभाव २ हजार ५०० रुपये हेक्टरी करा, प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान त्वरित देण्यात यावे, शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन व टॅब उपलब्ध देण्यात यावे, बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
यावेळी तुमसर-मोहाडी मार्गावर रस्ता अडविण्यात आला होता. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी स्वतः आंदोलन स्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात पुरुषोत्तम पात्रे, राजू माटे, धनेंद्र तुरकर, यासिन छव्वारे, रफिक सैय्यद, चंद्रप्रकाश गायधने, सुरेश रहांगडाले, पद्ममा ठाकूर, नरेश ईश्वरकर, बाणा सवालाखे, विजय बारई, सचिन पटले, महादेव पचघरे, महादेव बुरडे, सुमित पाटील, प्रदीप बुराडे, सतीश बांते, प्रतिभा कटरे, विजया चोपकर, कविता साखरवाडे, गीता माटे, प्रतिभा राखडे, मनोज वासनिक, उमेश कटरे, अनिता गजभिये, स्मिता मेश्राम, कल्पना खैरे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी होते.