इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:34 PM2018-09-01T23:34:42+5:302018-09-01T23:35:05+5:30

सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात दररोज भाववाढ केली. यामुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला.

NCP's strike against fuel hike | इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीची धडक

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीची धडक

Next
ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा : ‘अच्छे दिन’च्या घोषणेचा घेतला समाचार, प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात दररोज भाववाढ केली. यामुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा पेट्रोलपंपासमोरून गेला त्यावेळी नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी येथील विश्रामगृहासमोरून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, अनिल बावनकर यांनी केले.
हा मोर्चा जिल्हा कचेरी परिसरातील पेट्रोलपंपासमोर गेला असता मोर्चेकºयांनी शासनाच्या विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. पेट्रोलच्या वाढत्या दराबद्दलही रोष व्यक्त करण्यात आला. यानंतर हा मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहचला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅसची भाववाढ त्वरीत मागे घ्यावी या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले.
या मोर्चात विजय खेडीकर, अभिषेक कारेमोरे, नरेंद्र झंझाड, देवचंद ठाकरे, विवेक कुर्झेकर, धनेंद्र तुरकर, विठ्ठल कहालकर, डॉ.विकास गभणे, स्वप्नील नशिने, डॉ.रविंद्र वानखेडे, महेंद्र गडकरी, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, नितीन तुमाने, अरुण अंबादे, भोजराज वाघमारे, जुगल भोंगाडे, रेखाताई ठाकरे, नितीन खेडीकर, राजकुमार माटे, सुमेध शामकुवर, वासुदेव बांते, अमर उजवणे, हेमंत महाकाळकर, धनू व्यास, महेंद्र बारापात्रे, परवेज पटेल, राजू हाजी सलाम, नरेश येवले, प्रशांत मेश्राम, यशवंत मडामे, आशिष दिघोरे, स्वप्नील नशिने, प्रभू फेंडर, भरत लांजेवार, यशवंत सोनकुसरे यांच्यासह करुणा घोडमारे, निलीमा गाढवे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: NCP's strike against fuel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.