स्त्री शक्ती जागृत करण्याची गरज

By admin | Published: March 14, 2016 12:30 AM2016-03-14T00:30:23+5:302016-03-14T00:30:23+5:30

महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लघु गृहउद्योग, स्त्री स्वत:च्या कर्तुत्वाने कुटुंबाची ...

The need to awaken the woman's power | स्त्री शक्ती जागृत करण्याची गरज

स्त्री शक्ती जागृत करण्याची गरज

Next

पवनीत मेळावा : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन
पवनी : महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लघु गृहउद्योग, स्त्री स्वत:च्या कर्तुत्वाने कुटुंबाची व पर्यायाने देशाची प्रगती करु शकते तसेच उद्योगपतीला सुध्दा कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे स्त्री शक्त्ीचा वापर कसा करावा हे समजाने ठरवावे. मात्र बदललेल्या परिस्थितीत स्त्री शक्त्ी जागृत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
महिला व बालकल्याण समिती नगरपरिषदतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न.प. अध्यक्ष रजनी मोटघरे यांनी भूषविले. न.प. उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती पुष्पा भुरे, महिला व बालविकास अधिकारी रवींद्र चव्हाण विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक माया खापर्डे, सुरेखा जनबंधू, हिरा मानापुरे, मसुद खॉ मेहबुब खॉ, समाजसेवीका सुनंदा मुंडले, महिला बाल कल्याण समिती सभापती वनिता सयाम तसेच मुख्याधिकारी नवनीत कोर (भा.प्र.से) माजी नगरसेवक रत्नमाला रामटेके, अशोक पारधी, ब्रह्मदास बागडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर यांनी महिलांनी सक्षम होण्यासाठी न्युनगंड दूर करावा व शासकीय योजनांचा कायदा घेवून व्यवसाय करावा असे आवाहन केले.
अध्यक्षा रजनी मोटघरे यांनी महिला सक्षम आहेत पंरतू पुरुषप्रधान संस्कृतीमुळे त्यांना अबला समजण्यात येते व स्त्री उपभोग वस्तू असल्याचे मानल्या जाते. हा विचार बदलण्याची गरज असल्याने महिलांनी स्वहितासाठी पुढाकार घ्यावा असे विचार व्यक्त केले. सुनंदा मुंडले, हिरा मानापुरे व रवींद्र चव्हाण यानी समयोचित मत व्यक्त केले.
१३ महिला बचत गटांना फिरते भांडवल म्हणून प्रत्येकी १० हजार रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला. बचत गटांतर्गत उत्पादीत वस्तूची प्रदर्शनी लावण्यात आलेली होती. प्रास्ताविक सहा. प्रकल्प अधिकारी सरिता शेंडे यांनी केले. संचालन व आभार मुख्याध्यापिका पुष्पा बागडे यांनी केले. समारोपप्रसंगी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The need to awaken the woman's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.