परिस्थितीच्या सामन्यासाठी आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:06 AM2017-12-22T00:06:21+5:302017-12-22T00:06:42+5:30
आजच्या कठीण जगामध्ये जगण्यासाठी हिमालयासारखी दृढता आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोखंडाचे बळ आपल्या छातीमध्ये असायला हवे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर आरोग्य संपन्न असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : आजच्या कठीण जगामध्ये जगण्यासाठी हिमालयासारखी दृढता आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोखंडाचे बळ आपल्या छातीमध्ये असायला हवे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर आरोग्य संपन्न असेल. सर्वच विद्यार्थी एक सारखे नसतात. येणाºया परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन क्रीडासंघटक शाहीद कुरैशी यांनी केले.
स्थानिक कृष्णमुरारी कटकवार विद्यालय, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित स्व.कटकवार जयंती महोत्सव व वार्षिकोत्सवानिमित्त आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन पर्यवेक्षक हिवराज येरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवदास लांजेवार, बाळकृष्ण लंजे, शिवपाल चन्ने, सीमा येळेकर उपस्थित होते. वर्ग ५ ते ७ मुले मुली, वर्ग ८ ते १० मुले मुली, ११, १२ कला व विज्ञान विभाग अशा गटात स्पर्धा घेण्यात आल्या.
पर्यवेक्षक येरणे यांनी शाळेमध्ये विविध स्तर, वातावरणातील मुले येत असतात. वर्षभर विविध स्पर्धा परीक्षा, अभ्यास होत राहतो. म्हणून दरवर्षी विद्यालयात वेगवेगळ्या गटात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
शिवदास लांजेवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाचे धडे घ्यावे, आरोग्याच्या दृष्टीकानातून शालेय जीवनापासून खेळाकडे लक्ष दिल्यास शरीराला बळ मिळण्यास मदत होते.
विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. स्पर्धेचे पंच म्हणून शाहिद कुरैशी, संजय भेंडारकर, दिनेश उईके, चन्ने, प्रा.केशव कापगते, विनोद हातझाडे, प्रा.भालेराव, संजय पारधी, मडकवार, कृष्णा बिसेन, प्रा.प्रशांत शिवणकर व खेळाडू विद्यार्थी यांचे सहकार्य मिळाले. सर्व सहभागी खेळाडूंचे संस्थाध्यक्षा विद्या कटकवार व प्राचार्य विजय देवगिरकर यांनी कौतुक केले.