खटले निराकरणासाठी सहकार्याची गरज
By admin | Published: September 30, 2016 12:46 AM2016-09-30T00:46:16+5:302016-09-30T00:46:16+5:30
न्यायालयात अनेक प्रलंबित खटले अडून पडले आहे. हे खटले त्वरीत निकाली काढण्याकरिता पक्षकारांची व वकिलांचे सहकार्य आवश्यक आहे.
कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर : एस.एस. सय्यद यांचे प्रतिपादन
पवनी : न्यायालयात अनेक प्रलंबित खटले अडून पडले आहे. हे खटले त्वरीत निकाली काढण्याकरिता पक्षकारांची व वकिलांचे सहकार्य आवश्यक आहे. मध्यस्थीच्या मार्गाने तसेच लोकअदालतच्या मार्गाने या खटल्याचा निपटारा जलद होऊ शकतो.
समझोताच्या माध्यमातून पक्षकारांनी सहकार्य केल्यास न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यास मदत होईल व पक्षकारांचा वेळ पैसा व मानसिक ताण कमी होईल. याकरीता सर्वांनी या कार्यात सहकार्य करावे तसेच ६ ते १४ या गटातील मुलांना असे आवाहन पवनी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. सय्यद यांनी व्यक्त केले ते कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरात शिबिराचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
तालुका विधी सेवा समिती व वकील संघ पवनी यांची संयुक्त विद्यमाने पवनी येथील न्यायमंदिरात २८ सप्टेंबरला एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती एस.एस. सय्यद होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. डब्ल्यु. कावळे, अॅड. एस.एम. भुरे, अॅड. एस.एस. तलमले, अॅड. वाय.एस. सूरवदेने, अॅड. एस.डी. सावरकर, अॅड. आर.बी. बावने उपस्थित होते. अॅड. भुरे यांनी नागरिकांची अधिकार व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. अॅड. कावळे यांनी संविधानाचे महत्व व संकल्पना व्यक्त केली. अॅड. तलमले यांनी आपसी झगडे समझोताच्या माध्यमातून सोडवावी या विषयी मार्गदर्शन केले तर अॅड. सावरकर यांनी मुलींचे घटस्फोट व त्यामागील कारणे तसेच संयुक्त कुटूंबाची गरज यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अॅड. राहूल बावणे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)