स्तुपाच्या विकासासाठी सहकार्य गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:56 PM2018-03-27T22:56:28+5:302018-03-27T22:56:28+5:30
अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे.
आॅनलाईन लोकमत
पवनी : अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे. या प्राचीन पवनी शहरात सम्राट अशोक येवून गेल्याची नोंद आहे. येथील प्राचीन स्तुपाचे उत्खनन करुन विकास केल्यास पवनी एक मोठे आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनेल. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत सोनवाने यांनी केले.
डॉ.सोनवाने सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पवनीचे प्राचीन महत्व’ या विषयावरील पॉवर पार्इंट हाईटेक सादरीकरणात बोलत होते. अध्यक्षस्थानी रायदीघीचे भदंत ज्ञानज्योती, उद्घाटक भदंत संघरत्न मानके तर प्रमुख उपस्थितीत वडसाचे इंजि. डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, माजी न्यायाधीश अॅड. महेंद्र गोस्वामी, लाखांदुरचे प्रा. अनिल कानेकर, प्राचार्य उध्दव रंगारी, सत्यजीव मौर्य उपस्थित होते. डॉ. ज्ञानज्योती यांनी त्रिशरण, पंचशील देवुन मार्गदर्शनात सांगितले की, भारतात व विदेशात बौध्द धर्म वाढविण्याचे काम हजारो वर्षापुर्वी सम्राट अशोका ने केले आहे. त्यामुळे सम्राट अशोकांना कोणत्या करणामुळे राजत्याग करावा लागला याचा विचार करुन जनतेने आज सम्राट अशोकांच्या बुध्दाच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. भदंत संघरत्न मानके यांनी आपल्या धम्मदेशनेत सांगितले की, सम्राट अशोक व त्यांची कन्या संघमित्रा पवनी ला येवून गेल्याची इतिहासात नोंद असल्यामुळे पवनीला फार महत्व आहे. येथील प्राचीन स्तुपाचा सरकारने विकास करण्याची गरज आहे.
अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी येथील स्तुपांचा विकास सरकार करत नसेल बौध्द राष्ट्राची मदत घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, प्रा. अनिल कानेकर, उध्दव रंगारी यांनी अशोकाच्या जीवनावर प्रकाश टाकला. सत्यजीत मौर्य यांनी अशोकाच्या अनेक पैलुवर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मान्यवरांना राष्ट्रीय सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत तागडे, संचालन डॉ. चंद्रशेखर कौशल बांबोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आनंदविलास रामटेके, रमेश मोटघरे, सुरेखा जनबंधू, अंजीरा भाजीखाये, विनायक ढोक, गुलाम रामटेके, ईश्वर रामटेके, नवनाथ आकरे, भक्तराज गजभिये, गुलाब मेश्राम, विपुल रामटेके, प्रमीला टेंभुर्णे, आनंद वाहणे, रत्नमाला रामटेके, अजय रामटेके आदीनी विशेष सहकार्य केले.