समतामूलक समाज निर्माण करण्याची गरज
By admin | Published: April 16, 2017 12:21 AM2017-04-16T00:21:01+5:302017-04-16T00:21:01+5:30
देश हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर चालत आहे. एस.सी., एस.टी., ओबीसी यांनी हा दिवस सणासारखा साजरा करावा.
बाबू आंबेडकर यांचे प्रतिपादन : आयुध निर्माणी जवाहरनगर येथे कार्यक्रम
जवाहरनगर : देश हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर चालत आहे. एस.सी., एस.टी., ओबीसी यांनी हा दिवस सणासारखा साजरा करावा. यासाठी डॉ.आंबेडकरांचे घटनादत्त विचार ग्रहण करावे. बालकांचे घटनेने दिलेले हक्क अबाधित राखण्यासाठी समतामूलक समाज निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अप्पर महाप्रबंधक सी.एच. बाबू आंबेडकर यांनी केले.
आयुध निर्माणी बुद्ध विहार समिती कोंढी जवाहरनगरद्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रसंगी लुंबिनी पार्क जवाहरनगर, वसाहत येथील कार्यक्रमात अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी संयुक्त महाप्रबंधक सुनिल सप्रे, व्ही.बी. कुरील, एस.आर. चन्ने, ओ.एस. मुंडे, समितीचे अध्यक्ष लक्ष्मण तिरपुडे, आय.ओ.एफ. शाखेचे अध्यक्ष मंदीपसिंह कोहली, एच.ओ.एस. अरुण कावळे, आर. एच. बिसेन, आर.आर. बागडे, हेमंत बडगे, यु.आर. टोपणे उपस्थित होते.
यावेळी संयुक्त महाप्रबंधक सुनिल सप्रे म्हणाले, हा देश विविध जाती धर्माचा देश आहे. यांना डॉ.आंबेडकरांनी महात्मा बुद्ध यांच्या विचारणीला अनुसरून एकसुत्र धाग्यात संविधानारुपी गुंफून देश विकासाचे कार्य होताना दिसत आहे. सर्वांनी संविधानाचे पालन करून देश सेवा करण्याची आज गरज प्रतिपादीत केली. याप्रसंगी एस.चन्ने, ओ.मुंडे, व्ही. कुरील यांनी जीवन कार्यावर भाषणे दिली.
पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. यात संगीत खुर्चीत अर्चन श्यामकुवर, सरिता कांबळे, मीना शामकुवर, रांगोळी स्पर्धेत सीमरन नागदेवे, आकाश रामटेके, अथर्व तिरपुडे, प्रश्नोत्तरी स्पर्धेत प्रियंका मेश्राम, खुशबू चव्हाण, शीतल बंसोड, चित्रकला स्पर्धेत अनिल सुखदेवे, अर्थव तिरपुडे, अंशुल चिमनकर, निबंध स्पर्धेत प्रज्ञा सुखदेवे, उर्वशी चिमनकर, मुस्कान नागदेवे यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी लुंबीनी पार्क येथे सी.एच.बाबू आंबेडकर यांच्या हस्ते बौद्धी बोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. सकाळी काढण्यात आलेल्या भीम रॅलीचे विसर्जन लुंबीनी पार्क येथे सभेत करण्यात आले. यात कोंढी, सावरी, इंदिरानगर, जवाहरनगर येथील बुद्ध विहार येथील पदाधिाकरी, सदस्य, उपासक उपासिका उपस्थित होते. संचालन विजय श्यामकुवर यांनी तर आभारप्रदर्शन ए.आर. मोटघरे यांनी केले. कार्यक्रमासाठी लक्ष्मण तिरपुडे, सुमेध शामकुवर, व्ही.टी. शामकुवर, ए.आर. मोटघरे, देवेंद्र गेडाम, सुशील बागडे, राजेश सुखदेवे, डी.एम. मेश्राम, आर.एम. चव्हाण, उरकुडा गोंडाणे, रंजित बागडे, श्रीराम सुखदेवे, राजकुमार अंबादे, शैलेश गोंडाणे, गजेंद्र टेंभुर्णे, सचिन नागदेवे, निशांत बागडे, सुभाष मेश्राम, जितेंद्र मेश्राम, एम.माहुरे, एस.घरडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)