नेत्रदान चळवळीसाठी जागृत समाज निर्मितीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:50 AM2018-09-13T00:50:22+5:302018-09-13T00:52:12+5:30
माणसामध्ये श्रद्धा असली पाहिजे ती डोळसपणाची नको, तर ती दुरदृष्टीकोणातील परिवर्तनशिल श्रद्धा असावी, अंधश्रद्धा ही कौटुंबिक जिवनाला घातक ठरतो. याकरिता विद्यार्थ्यामध्ये लोकजागृती निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने नेत्रदान चळवण यशस्वी होईल, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : माणसामध्ये श्रद्धा असली पाहिजे ती डोळसपणाची नको, तर ती दुरदृष्टीकोणातील परिवर्तनशिल श्रद्धा असावी, अंधश्रद्धा ही कौटुंबिक जिवनाला घातक ठरतो. याकरिता विद्यार्थ्यामध्ये लोकजागृती निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने नेत्रदान चळवण यशस्वी होईल, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
महाराष्ट्र शासन जिल्हा आरोग्य सेवा व जिल्हा अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षीणता सोसायटी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय पोषाहार व नेत्रदान पंधरवाडाचे समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आमदार बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल वढे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. रेखा धकाते, डॉ. विनोद घडसिंग, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. पशिने, आहारतज्ञ विनिता चकोले उपस्थित होते.
डॉ. माधुरी थोरात म्हणाल्या की, आपण रोजच्या आहारामध्ये जे अन्न खातो ते पोषक असल्यामुळे विदेशी जंकफुड व फास्टफूच्या आहारी पालकांनी व मुलांनी जावू नये ते मुलांच्या आरोग्याला घातक आहे. नेत्रदान हे श्रेष्ठ दान असल्यामुळे संपूर्ण जग आपण नेत्रदानाद्वारे बघू शकतो व तशी संधी अंधाना उपलब्ध करून द्यावी. आहारतज्ञ विनिता चकोले यांनी शरीराला लागणारे पोषाहार संबंधी सखोल माहिती याप्रसंगी दिली.
उपस्थित सामाजिक कार्यकर्ता दिलीप चित्रीव आपल्या मनोगता आपल्या गावातील म्हणजे विरली बु. येथील संकल्पना सांगितले की जिल्हामध्ये असं एक गाव म्हणजे विरली बु. या गावात कोणाचाही मृत्यु झाल्यास नेत्रदान केल्या जातो. आतापर्यंत शासनाकडून कोणताही सहकार्य न घेता २००४ पासून गावात तसेच परिसरात आॅगस्ट २०१८ पर्यंत एकूण ७५ व्यक्तीचे नेत्रदान घडवून आणले. ही नेत्रदानाची चळवळ संपूर्ण जिल्हामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. प्रसंगी नेत्रदान पंधरवाडा व राष्ट्रीय पोषहार सप्ताह निमित्त्याने जिल्ह्यातील विविध शाळामध्ये घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, रांगोळी व व्याख्यान स्पर्धेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्याच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. रेखा धकाते यांनी केले. संचालन सोनाली लांबट हिने केले. उपस्थितांचे आभार डॉ. विनोद घडसिंग यांनी केले.