प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:10 PM2017-10-22T22:10:03+5:302017-10-22T22:10:17+5:30

आजच्या पिढीला प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. आज साधारण दुखल्यास 'पेनकिलर' या अ‍ॅलोपेथी औषधींचा वापर करीत आहोत. या सवयीमुळे शरीरातील किडनी, लिव्हर नष्ट होऊन मनुष्य मृत्युमुखी पडतो.

The need to cultivate ancient culture | प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज

प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज

Next
ठळक मुद्देगुरुचरण नंदागवळी : पवनी ग्रामीण रुग्णालयात आयुर्वेद दिन

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : आजच्या पिढीला प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. आज साधारण दुखल्यास 'पेनकिलर' या अ‍ॅलोपेथी औषधींचा वापर करीत आहोत. या सवयीमुळे शरीरातील किडनी, लिव्हर नष्ट होऊन मनुष्य मृत्युमुखी पडतो. आयुर्वेदचा उपचार हा उशिरा काम करतो, परंतु तो कायमस्वरुपी उपचार करतो, असे प्रतिपादन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुरुचरण नंदागवळी यांनी केले.
राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा येथील ग्रामीण रुग्णालय व आयुष यांच्या मार्फत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ.गुरुचरण नंदागवळी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.आशीष मोहरकर, डॉ.संगीता देशमुख, अक्षय प्रकल्प समन्वयक शाहिद अली उपस्थित होते. मागील वर्षापासून धन्वंतरी जयंती हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य हा कसा सदृढ करता येईल, याबद्दल आयुर्वेदाचार्य डॉ.आशीष मोहरकर यांनी माहिती दिली. डॉ.आशीष मोहरकर म्हणाले, आहार विहाराच्या माध्यमातून मधूमेहापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो. मधूमेह होऊ नये यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून मधुमेहापासून दूर राहू शकतो, यावर मार्गदर्शन केले. माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्याकरीता आयुर्वेदांतर्गत गर्भसंस्कार करून योग्य आहार - विहार घेवून सृदृढ संतती व सुदृढ माता निर्माण करता येईल, असे प्रतिपादन केले.
डॉ.संगीता देशमुख यांनीही याप्रसंगी आयुर्वेद व भारतीय संस्कृतीनुसार आहार - विहार केल्यास नक्कीच आरोग्य प्राप्त केल्यास आपण अनेक आजारापासून दूर राहू असे याप्रसंगी सांगितले. संचालन आरोग्य सेवक सतीश वंजारी व आभार मयूरी यांनी मानले. या वेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: The need to cultivate ancient culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.