बालमनात विज्ञाननिष्ठ गुण रुजविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:45 PM2019-01-11T21:45:01+5:302019-01-11T21:45:38+5:30
जीवनामध्ये कमवायचे असेल तर धैर्य-चिकाटीने शिक्षणविषयक ज्योत हृदयात तेवत ठेवावी. वेळेवर अभ्यास करा. शिकवणीची गरज भासणार नाही. यासाठी काळानुरुप बालमनापासून विज्ञाननिष्ठ गुण रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुध निर्माणीतील सुरक्षा विभाग प्रमुख कर्नल शिवाजी वारघडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : जीवनामध्ये कमवायचे असेल तर धैर्य-चिकाटीने शिक्षणविषयक ज्योत हृदयात तेवत ठेवावी. वेळेवर अभ्यास करा. शिकवणीची गरज भासणार नाही. यासाठी काळानुरुप बालमनापासून विज्ञाननिष्ठ गुण रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुध निर्माणीतील सुरक्षा विभाग प्रमुख कर्नल शिवाजी वारघडे यांनी केले.
महाराष्टÑ विद्या प्राधिकरण पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकास हायस्कुल कोंढी जवाहरनगर येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परीषद शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लक्ष्मण पाच्छापुरे होते. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविंद्र काटोलकर, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य तथा विद्यापिठ सिनेट सदस्य डॉ. अशोक कापगते, सेवानिवृत्त विज्ञान पर्यवेक्षक शत्रुघ्न कोळवती, जि.प शिक्षण विस्तार अधिकारी प्रदिप गणविर, अशोक भानारकर, कविता पाटील, केंद्र ठाणाचे केंद्रप्रमुख वसंत साठवणे, विज्ञान पर्यवेक्षक राजू हिरेखन, सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी खेडकर, अधीक्षक शामकुवर, अंबादे, शेंडे, गटशिक्षणाधिकारी फसाटे, संस्था सचिव रामकुमार गजभिये, प्राचार्य के. सी. शहारे, नानाजी कारेमोरे, सरपंच माया वासनिक, संस्थापक अध्यक्ष वासुदेवराव गजभिये, प्राचार्य एस. एस. शेंदरे, मुख्याध्यापक पी. एस. नागदेवे, माजी गटशिक्षणाधिकारी फसाटे उपस्थित होते.
डॉ. अशोक कापगते म्हणाले, विद्यार्थी दशेतील जीवन उद्ध्वस्त होत आहे. याचा विद्यार्थ्यांमधील सवयींचा शोध घेणे आज काळाची गरज आहे. शहरी व ग्रामीण शिक्षणामध्ये तफावत जाणवीत आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. मुलांनी ध्येयपूर्तीसाठी स्वप्न पहा. बुध्दी मुळाप्रमाणे वाढवा. शिक्षणामध्ये उच्च भरारी घ्या. पण गुरुजन, आई-वडिलांचे उपकार विसरु नका. शिक्षणाधिकारी लक्ष्मण पाच्छापुरे म्हणाले, विज्ञानातील प्रयोग समजण्याची गरज आहे. आपल्यामधील उदासिनतेला टाळावे, परिस्थितीला मात करुन जो ध्येय गाठतो ते खरा विद्यार्थी. मनावर संयम ठेवा, अहंकाराचा वारा लाऊ नका. केवळ प्रयोगापर्यंत मर्यादित राहू नका. दैनिक जीवनात विज्ञानाचा वापर करा.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक - माध्यमिक व प्रयोगशाळा परिचर असे एकूण ७७ प्रतिकृती सहभागी होणार आहेत. यामधुन प्राथमिक व माध्यमिक विभागामधुन प्रत्येकी तीन-तीन प्रतिकृती निवड करण्यात येणार असून निवड झालेली प्रतिकृती राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये पाठविण्यात येणार आहे. प्रास्ताविक आर. काटोलकर यांनी केले. संचालन प्रा. शिलवंतकुमार मडामे यांनी केले. आभार संस्थाध्यक्ष वासुदेवराव गजभिये यांनी मानले.