भात शेतीसह कृषी पूरक व्यवसाय करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:43+5:302021-08-29T04:33:43+5:30

साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित आढावा सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एस. ...

Need to do agricultural supplementary business including paddy farming | भात शेतीसह कृषी पूरक व्यवसाय करणे गरजेचे

भात शेतीसह कृषी पूरक व्यवसाय करणे गरजेचे

Next

साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित आढावा सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एस. वझिरे, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर यांच्यासह साकोलीचे कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

लखन सिंग म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पीक बदलाविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यांना पारंपरिक भात शेतीसोबतच भाजीपाला, फळ, रेशीम, लाख, पशुपालन व दुग्ध व्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन, आदी शेतीपूरक व्यवसाय करण्यास प्रेरित करावे. त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करावी.

याप्रसंगी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी, तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. या कार्यक्रमाप्रसंगी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी घनश्याम पारधी यांच्या प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. प्रमोद पर्वते यांनी सूत्रसंचालन केले, तर सुचित लाकडे यांनी आभार मानले.

बॉक्स

धान पिकाची केली पाहणी

कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. लखन सिंग यांनी श्याम खेडीकर (रा. खेडेपार) व एकनाथ शेंडे रा. मुंडीपार यांच्या शेतावरील राईस ग्रेन प्लांटरच्या साहाय्याने पेरीव पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या धान पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आधुनिक शेतीचे धडे दिले.

Web Title: Need to do agricultural supplementary business including paddy farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.