शैक्षणिक क्रांतीची गरज

By admin | Published: November 17, 2015 12:42 AM2015-11-17T00:42:53+5:302015-11-17T00:42:53+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळाले आदिवासी समाज्याला शिक्षणाचा अधिकारही मिळाला असला तरी ज्या प्रमाणात आदिवासी समाजात शैक्षणिक क्रांती व्हायला पाहिजे तेवढी मात्र दिसत नाही...

The Need for Educational Revolution | शैक्षणिक क्रांतीची गरज

शैक्षणिक क्रांतीची गरज

Next

बिरसा मुंडा जयंती : हरिराम मडावी यांचे प्रतिपादन
अडयाळ : देशाला स्वातंत्र्य मिळाले आदिवासी समाज्याला शिक्षणाचा अधिकारही मिळाला असला तरी ज्या प्रमाणात आदिवासी समाजात शैक्षणिक क्रांती व्हायला पाहिजे तेवढी मात्र दिसत नाही त्यामुळे समाजात शैक्षणिक क्रांती होणे गरजेच आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना सोयी सुविधांचा लाभ समाजबांधवाने घेवून शैक्षणिक क्रांती करावी असे आवाहन भंडारा आदिवासी प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांनी केले.
विर बिरसा मुंडा यांच्या १४० व्या जंयती सोहळ्याचे आयोजन आदिवासी विद्यार्थी संघ, विर बिरसा मुंडा स्मारक समिती, महाराणी दुर्गावती, महिला समिती अड्याळ तर्फे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भंडारा आदिवासी प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी होते. उद्घाटन दुर्योधन सय्याम यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा जुमनाके कोसरा, शंकर टेकाम, श्रीराम ढवळे, महेश कोडापे, अस्मिता सलामे पं.स. सदस्य, सुनिल पोटवार आदी उपस्थित होते.
प्रास्तावकि चंद्रशेखर कोडापे तर संचालन अनिल कोडापे व आभार अशिष नैतामे यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: The Need for Educational Revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.