सम्राट अशोक यांचे कार्य समाजात पोहचविण्याची गरज
By admin | Published: April 12, 2017 12:50 AM2017-04-12T00:50:20+5:302017-04-12T00:50:20+5:30
संपूर्ण भारताचा सातबारा ज्याच्या नावाने आहे, ज्याचे चक्र राष्ट्रध्वजावर आहे, ...
श्रीधर साळवे यांचे प्रतिपादन : नाकाडोंगरी येथे भीम सेनेची स्थापना
तुमसर : संपूर्ण भारताचा सातबारा ज्याच्या नावाने आहे, ज्याचे चक्र राष्ट्रध्वजावर आहे, सत्यमेव जयते हे ब्रिद वाक्य व त्याच्या सिंहाची प्रतिमा ही देशाची मुद्रा म्हणून स्वीकारली जाते अशा महानतम राजा सम्राट अशोक यांचा इतिहास पुसण्याचा डाव पुरोगामी सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. त्यामुळेच की काय या देशात अशोक जयंती साजरी होत नाही. परंतु त्या महान सम्राट अशोकाची समाजात पोहचविण्याचे कार्य भीम सैनिकांनी करावे असे प्रतिपादन भीम सेनेचे संस्थापक श्रीधर साळवे यांनी केले.
नाकाडोंगरी येथे भीम सेनेची शाखा उद्घाटन व सम्राट अशोक जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवेंद्र घरडे, आकाश टेंभुर्णे, राजा नगराळे, पारस पाटील, निशांत नांदगाये, अतुल मेश्राम, गोबरवाहीचे ठाणेदार किशोर सोटींग, प्यारेलाल धारगावे, शेखर कोतपल्लीवार, जितेंद्र सर्याम, उमाकांत भैसारे, दिनेश मेश्राम, रजनी घडले, राजानंद बोरकर उपस्थित होते.
यावेळी साळवे म्हणाले, आयोग्यासाठी आरोग्यशाळा, शिक्षणासाठी पाठशाला निर्माण केली. मुलांचे संगोपन ही राज्याची जबाबदारी आहे असा नियम बनविला. असे अनेक कार्य सम्राट अशोकांचे सांगता येतील. मात्र ज्यांच्या नावाचा चिन्हांचा आदी सर्व गोष्टीचा वापर भारताच्या राजमुद्रेवर असताना सरकारला त्यांच्या जयंतीचा विसर पडला आहे. प्रास्ताविक वाचन माणिक नांदगाये यांनी केले. संचालन राहुल भुतांगे यांनी तर आभार रजनी घडले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुजित वासनिक, गौतम नंदागवळी, बल्ल मेश्राम, लक्की घडले, निशिकांत वासनिक, विक्की घडले, पारस बोरकर, पाहुल दहाट, जय उके, श्रेयस बोरकर, राकेश मेश्राम, निलेश डोंगरे, विकांत घडले, प्रणय रामटेके, प्रणित गजभिये, पंकज वासनिक, अक्षय दहाट उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)