अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज

By Admin | Published: April 9, 2017 12:29 AM2017-04-09T00:29:39+5:302017-04-09T00:29:39+5:30

अंधश्रद्धा ही आधुनिक युगात समाजाला लागलेली कीड आहे. अंधश्रद्धेमुळे समाजाची अधोगती होत आहे.

The need for eradication of superstitions is the need of the hour | अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज

googlenewsNext

राहूल डोंगरे : लेंडेझरी येथे मोबाईल कायदेविषयक साक्षरता शिबिर
तुमसर : अंधश्रद्धा ही आधुनिक युगात समाजाला लागलेली कीड आहे. अंधश्रद्धेमुळे समाजाची अधोगती होत आहे. अनिष्ट रूढी, परंपरा, दैवधर्म, भूतपिशाचामध्ये समाज गुरफुटलेला दिसून येतो. विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाने जगाचा कायापालट केला हे सत्य असून सुद्धा समाज अंधश्रद्धेला बळी पडत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांची चिकित्सक वृत्ती वाढीस लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी केले.
लेंडेझरी येथे कायदेविषयक साक्षरता शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, जादुटोना विरोधी कायदा विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुमसर न्यायालयाचे न्यायाधीश पाटील होते. अतिथी म्हणून अ‍ॅड. एस.के. सक्सेना, अ‍ॅड.डी.पी. रावलानी, अ‍ॅड.डी.एम. गहाणे, अ‍ॅड. राजेश राहुल, अ‍ॅड.रावलानी उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. डी.पी. रावलानी यांनी मध्यस्थी व मुलभूत कर्तव्ये या विषयावर विचार मांडले. संचालन अ‍ॅड. राजेश राहूल यांनी केले. शिबिरात लेंडेझरी परीसरातील महिला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The need for eradication of superstitions is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.