स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दिशा देण्याची गरज
By admin | Published: September 30, 2016 12:48 AM2016-09-30T00:48:25+5:302016-09-30T00:48:25+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थी आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्या कौशल्य आहेत.
विनीता साहू यांचे प्रतिपादन : करडी येथे गुणवंतांचा सत्कार
करडी (पालोरा) : ग्रामीण भागातील विद्यार्थी आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्या कौशल्य आहेत. गरज आहे ती गुणवंतांना योग्य दिशा व मार्गदर्शनाची. करडी शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्येक क्षेत्रातील कामगिरी मोठी आहे. चौथ्या वर्गातील तरबेज कलावंत प्रमाणे तबला वाजविताना पाहून आनंद वाटले. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये सर्वात्तम गुण प्राप्त केले. मीही मध्यप्रदेशातील मागास भागातून, कला शाखेतून पोलीस अधिक्षक पदापर्यंत स्पर्धा परीक्षांतील कठोर मेहनत व परिश्रमातून समोर आली आहे. लहानपणी लाल दिव्याची गाडी पाहून अचंबित व्हायची, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी केले.
करडी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वागत सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होत्या. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक विनीता शाहू होत्या. प्रमुख अतिथीस्थानी करडीच्या जि.प. सदस्या निलीमा इलमे, सरपंच सिमा साठवणे, निशिकांत इलमे, महेंद्र शेंडे, ठाणेदार प्रभाकर बोरकुटे, अयुब शेख, अनिल सार्वे, प्राचार्य दयाळनाथ माळवे उपस्थित होते. विनीता शाहू म्हणाल्या, करडी शाळेतील मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलींग स्पर्धेत खेळून असून त्या मुलीच्या पालकाचा सत्कार करताना गदगदल्यासारखे वाटत आहे. शाळेतील प्रत्येक मुलाने चांगले गुण संपादित केलेले आहे. त्यांच्या पालकांचा व शाळेतील शिक्षकांचा यात मोठा वाटा आहे. मुलांनी फक्त प्राथमिक शिक्षणावर न थांबता उच्च शिक्षण घेतले पाहिजे. कार्यक्रम सुरू असताना पावसाने मुसंडी मारली. शाळेच्या वतीने विनीता शाहू यांचा शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. जय हो चे नारे आसंमतात डिजेच्या तालात गुंजले, प्रास्ताविक दयाळनाथ माळवे यांनी केले. संचालन के.पी. बंसोड यांनी मानले. यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. (वार्ताहर)