यशप्राप्तीसाठी कठीण परिश्रमाची गरज
By Admin | Published: January 31, 2015 11:15 PM2015-01-31T23:15:52+5:302015-01-31T23:15:52+5:30
प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनात आणल्यास यश हे मिळतेच आणि यशप्राप्तीसाठी प्रत् येकाने कठीण परिश्रम करण्याची गरज आहे. यश मिळविण्यामागे गुरुजनांचा फार मोठा वाटा असतो
भंडारा : प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनात आणल्यास यश हे मिळतेच आणि यशप्राप्तीसाठी प्रत् येकाने कठीण परिश्रम करण्याची गरज आहे. यश मिळविण्यामागे गुरुजनांचा फार मोठा वाटा असतो असे प्रतिपादन रुपाली चिमणकर यांनी व्यक्त केले.
जागृती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोसरा येथून बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेली रुपाली चिमणकर व वर्ग १० वी मध्ये प्रथम आलेली करिश्मा मेश्राम यांचा गणपती पाटील कुर्झेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन संस्थाध्यक्ष हरिहर कुर्झेकर यांचेकडून तर प्राचार्य गहाणे यांचेकडून रोख रुपये देवून दोन्ही विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना रुपाली चिमणकर बोलत होती. ती १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आल् याने तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष हरिहर कुर्झेकर तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव एम.एस. मूर्ते, प्राचार्य ई.एम. गहाणे, कोषाध्यक्ष डी.एन. बोरकर, उपाध्य सुनिल रत्नपारधी, सहसचिव दिवाकर डाकरे, उपसरपंच नेहा घोनमोडे सुभाष राऊत आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.शंकर गायकी तर आभार एस.आर. डहाके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही.सी. केरझरकर, एस.ई. मने, प्रा.देवगडे, कहालकर, पी.टी. भुसारी, ठवरे, गोंडाने, येळणे, भुते, गिऱ्हेपुंजे, गजभिये, संघरत्न आकरे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)