तंबाखू सोडण्याचा निर्धार करणे काळाची गरज

By admin | Published: June 3, 2017 12:26 AM2017-06-03T00:26:46+5:302017-06-03T00:26:46+5:30

तंबाखूच्या सेवनामुळे फक्त खाणाराच नाही तर त्यांचे संपूर्ण परिवार मृत्यूच्या दारी जातो.

The need of the hour is to make sure to quit tobacco | तंबाखू सोडण्याचा निर्धार करणे काळाची गरज

तंबाखू सोडण्याचा निर्धार करणे काळाची गरज

Next

रविशेखर धकाते : जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तंबाखूच्या सेवनामुळे फक्त खाणाराच नाही तर त्यांचे संपूर्ण परिवार मृत्यूच्या दारी जातो. म्हणून जागतिक तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखू सोडण्याचा निर्धार करा, असे आवाहन शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक तंबाखू नकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सलाम मुंबई फाऊंडेशनचे प्रतिनिधी मुकुंद ठवकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिता बढे, डॉ.किशोर चाचेरकर, डॉ.शेखर नाईक, डॉ.गोपाल सार्वे, डॉ.कापगते उपस्थित होते.
समाजामध्ये असलेल्या तंबाखूच्या घातक परिणामाचे विस्तृत व मार्मिक विश्लेषण करताना मुकुंद ठवकर यांनी तंबाखूचे दुष्परिणाम सांगून जनतेस तंबाखू सोडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात असर फाऊंडेशन भंडारा यांच्या उत्कृष्ट पथनाट्याद्वारे करण्यात आली. याद्वारे तंबाखूमुळे लहान मुलांचे आयुष्य कसे वाया जाते याबद्दल प्रात्यक्षिक करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा दंत चिकित्सक डॉ.मनिष बत्रा यांनी केले. संचालन प्राजक्ता पेठे यांनी तर आभार एनसीडी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.शैलेशकुमार कुकडे यांनी मानले. डॉ.सुधा मेश्राम यांनी उपस्थितांना तंबाखू न खाण्याची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या शेवटी सोनटक्के यांनी तंबाखू सोडण्याचा निर्धार केला. जिल्हा रुग्णालय येथे २५ रुग्णांची कर्करोग तपासणी करण्यात आली. १० कर्करुग्ण निदान करण्यात आले व ४ संशयीत आढळून आले असून पुढील उपचारासाठी त्यांना संदर्भीत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रियंका मिश्रा, लिलेश्वर निखारे, मनीष दयाल व एनसीडी व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: The need of the hour is to make sure to quit tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.