शिष्यवृत्ती प्रस्ताव स्वीकारण्यासाठी कर्मचारी वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:22+5:302020-12-25T04:28:22+5:30
सानगडी : शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व माध्यिमक विद्यालयांना जातनिहाय विद्यार्थ्यांचे संबंधित ...
सानगडी : शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व माध्यिमक विद्यालयांना जातनिहाय विद्यार्थ्यांचे संबंधित शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव स्वीकारुन भंडारा येथील जिल्हा समाज कल्याण विभाग येथे नेऊन द्यावे लागत आहे.
शासनाच्या वतीने वर्ग ५ ते १० च्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, वर्ग ९ ते १० मॅट्रीक पुर्व शिष्यवृत्ती वर्ग ५ ते १० मुले - मुली यांना मॅट्रीक पुर्व शिष्यवृत्ती, वर्ग ५ ते १० मधील मुला-मुलींना आदिवासी शिष्यवृत्ती योजना जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने आपल्या विद्यालयातील कोणताही लाभार्थी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापकांना घ्यावी लागत आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. शाळा बंद आहेत. विद्यार्थी व पालकांशी संबंधित शाळांचा पाहिजे तसा संबंध नाही. तरी संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन संबंधित शिष्यवृत्त्यांचे कागदपत्र गोळा करुन प्रस्ताव तयार केले आहेत. तयार असलेले सर्व प्रस्ताव भंडारा येथील समाजकल्याण विभागात सादर करावे लागत आहे. भंडारा येथे केवळ दोन टेबलावरुन जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांचे विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्यानचे प्रस्ताव स्वीकारल्या जात आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक व लिपीक यांना आपल्या शाळेचे प्रस्ताव सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिष्यवृत्तीचे देयके स्वीकारणारे कर्मचारी वर्ग तुलनेने कमी असल्यामुळे कित्येकांना देयके घेऊन परत जाण्यास सांगत आहेत. प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी फक्त कर्मचारी नेमून देयके स्वीकारल्यास कोणतीही अडचण येणार नाही. तरी देयके स्वीकारणारे कर्मचारी वाढविण्याची मागणी सर्वत्र होत आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी या मागणीच्या पुर्ततेसाठी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी सर्व मुख्याध्यापकांची मागणी आहे.