प्रज्ञा, शील, करुणाचे पालन काळाची गरज
By admin | Published: May 23, 2016 12:39 AM2016-05-23T00:39:24+5:302016-05-23T00:39:24+5:30
तथागत गौतम बुद्ध याांचे विचार हे दुसऱ्यावर प्रेम, आपुलकी निर्माण करण्यास शिकविते. आपले आचार, विचार सदैव निरोगी राखण्यास शिकवितो.
रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : बुद्ध जयंती कार्यक्रम, जयभीम युथ ग्रुपचा पुढाकार
जवाहरनगर : तथागत गौतम बुद्ध याांचे विचार हे दुसऱ्यावर प्रेम, आपुलकी निर्माण करण्यास शिकविते. आपले आचार, विचार सदैव निरोगी राखण्यास शिकवितो. तर गरजूंच्या मदतीला धावून जाण्यास शिकविते. परिणामी बौद्ध धम्म अंगीकारण्याचा धम्म आहे. यासाठी प्रज्ञा, शील, करुणाचे पालन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
जयभीम युथ ग्रृप परसोडी द्वारे आयोजित तीन दिवसीय बुद्ध जयंती कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पंकज सुखदेवे हे होतो. यावेळी पंचायत समितीचे सदस्य राजेश मेश्राम, उपसरपंच दर्शन फंदे, ग्रामपंचायत सदस्य कुलदीप कावळे, ओमकवन थापा, प्रणाली चव्हाण, कुंदा हटवार, कल्पना मोटघरे, श्यामकला चकोले, प्रिया शहारे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष ओमदेव चकोले, राहुल प्रित, राजविलास गजभिये, प्रमोद कावळे उपस्थित होते. राजेश मेश्राम म्हणाले, मानवाला माणुसकीसारखा वागण्यास शिकविणारा एकच मानवता धम्म म्हणजे बौद्ध धम्म होय. बुद्धांचे तत्वज्ञ हे सार्वभौम जनतेच्या कल्याणासाठी उपयोगी ठरतो. प्रिया शहारे म्हणाल्या, बुद्धांने दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे पालन करा, महिलांनी संघटीत व जागृक राहून अंधश्रद्धा दूर सारावे, असे प्रतिपादन केले.
तत्पूर्वी प्रथम दिनी बुद्ध भीमगीतांचा आॅर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रमुख पाहुण्यांचे बुद्ध जयंतीनिमित्त समयोचित भाषणे झाली. रात्रीला समाजप्रबोधनकार सतपाल महाराज यांचे शिष्य रामपाल धारकर महाराज यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी बुद्ध पौर्णिमानिमित्त सकाळी परित्राण पाठ आयोजित केले होते.
तद्नंतर सामूहिक भोजनदानाचा कार्यक्रम झाला. संचालन येवानंद वासनिक यांनी केले. आभार गौतम देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण भोयर, अरविंद मडाले, घनश्याम मोटघरे, मोरेश्वर कावळे, विनोद मेश्राम, प्रशांत मेश्राम, कुमार पाटील, गुलशन कावळे, शशांक गजभिये, वैभव कावळे, तुषार मंडाले, भारत गजभिये, पिंटू मेश्राम, प्रणय वासनिक, शुभम मेश्राम, नागसेन भोयर, साहील मोटघरे, प्रितम वैद्य, पतीराम चव्हाण, निखील मेश्राम, विशाल गजभिये, नरेश बावणे, सुशील वैद्य, अमी कावळे, जितू मोटघरे, अक्षय चौधरी, नाहील वासनिक, सम्मबुद्ध कावळे यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)