विकासासाठी सत्ता परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:55 PM2019-01-11T21:55:42+5:302019-01-11T21:56:20+5:30

देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

The need for power revolution for development | विकासासाठी सत्ता परिवर्तनाची गरज

विकासासाठी सत्ता परिवर्तनाची गरज

Next
ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : तुमसरात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.
जनसंघर्ष यात्रेच्या तुमसर शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर माजी प्रदेश अध्यक्ष, माणिकराव ठाकरे, आमदार, नसीम खान प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे अनंतराव घरड, माजी आमदार सेवक वाघाये, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अमरनाथ रगडे, रमेश पारधी, शंकर राऊत, नगरसेवक, राजेश ठाकूर, कलाम शेख, प्रभू मोहतुरे, शुभम गभने, आशिष पात्रे, सुनील गिरेपुंजे, शैलेश पडोळे, प्रफुल्ल बिसणे, देवेंद्र मेश्राम, आकाश काकडे, अमित लांजेवार, हरिराम निमकर, गिताताई बोकडे, प्रदीप वाडीभस्मे, राजन सिंगनजुडे, वीणा झंझाड, नैनश्री येळणे, सीमा बडवाईक, वषार्ताई बारई, स्मिता बोरकर, हसन रिझवी, आनंद बिसने, कान्हा बावनकर, नीरज गौर, सुरेश मेश्राम, आकाश बोंद्रे, महेश ढेंगे, युवा नेते पंकज कारेमोरे, आकाश काकडे, सहादेव तुरकर, अजय खंगार, बालकदास ठवकर संजय पिकलमुंडे, चैन मसरके व सरपंच आदी उपस्थित होते.
अशोक चव्हाण भाजपच्या नीती वर सडकून टीका करताना म्हणाले की, शेतकरी हवालदिल झाला असताना शेतपिकाला अजूनपर्यंत योग्य हमीभाव मिळाला नाही, कर्जमाफी झाली नाही, तीन राज्यात आमची सरकार येताच कर्जमाफी व २५०० रूपये हमीभाव देण्यात आला आहे. त्यामुळे आता फसवी सरकारला घरचा रास्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरनाथ रगडे यांनी केले.

Web Title: The need for power revolution for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.