स्पर्धा परीक्षेसाठी जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:00 PM2018-01-08T22:00:30+5:302018-01-08T22:00:54+5:30
सध्याचे युग स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून उच्च पद ग्रहण करावे.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : सध्याचे युग स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून उच्च पद ग्रहण करावे. स्पर्धा परीक्षेकरिता जनजागृतीची गरज आहे. उडान करिअर मार्गदर्शन केंद्रातर्फे नागपूर येथून झिरो माईल ते १०० कि.मी. पर्यंत सायकल रॅली काढली. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांनी नक्कीच प्रोत्साहन मिळेल असे मत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
तुमसर नगरपरिषद येथे आयोजित उडाण करीअर मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी कमलेश सोनाले, न.प. मुख्याधिकारी अर्चना मेंढे, न.प. उपाध्यक्ष कांचन कोडवानी, नगरसेवक मेहताबसिंग ठाकुर, सुनिल पारधी, डॉ.गोविंद कोडवानी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. रॅलीचे नेतृत्व परीक्षार्थी शैलेश कौशल यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी सोनाले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शैलेश कौशल, संचालन व आभार गणेश बर्वे यांनी मानले.