लोकसभा निवडणूक निकालावर संशोधन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:14 AM2019-05-29T01:14:01+5:302019-05-29T01:14:30+5:30

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, ......

Need to research on the results of Lok Sabha elections | लोकसभा निवडणूक निकालावर संशोधन करण्याची गरज

लोकसभा निवडणूक निकालावर संशोधन करण्याची गरज

Next
ठळक मुद्देनाना पटोले : भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, असे मत माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.
मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले मागील पाच वर्षात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही सातत्याने वाढत गेले. महागाई गगनाला भिडली तर डॉलरच्या मागे रुपयाची घसरण झाली. लहान व्यापारी बेहाल झाले. गरीबांच्या योजनांवर घाला घालण्यात आला. अशा विपरित स्थितीतही भाजपला बहुमत कसे काय मिळाले हाच आमचा मुख्य प्रश्न आहे. ईव्हीएम बाबत न्यायालयासह निवडणूक विभागाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र गावापासून राज्यापर्यंत संशोधन होणे गरजेचे असून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही नाना पटोले यांनी आवर्जून सांगितले.
हारणे व जिंकणे या स्पर्धेतील बाजू असल्या तरी लोकशाही रूजविलेल्या देशात पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. निकालानंतरची परिस्थिती पाहता देशात भीतीचे वातावरण आहे. निकाल हाती आल्यानंतर कुठेही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही. कुठेतरी काही कमी आहे व यावरच लोकांच्या मनातील संशय संशोधनाच्या माध्यमातून समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. येणारी निवडणूक बॅलेट पेपरवरच व्हावी अशी आमची मुख्य मागणी असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Need to research on the results of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.