समाजाचे संघटन बळकट होणे काळाची गरज
By admin | Published: December 28, 2015 12:58 AM2015-12-28T00:58:28+5:302015-12-28T00:58:28+5:30
जैन कलार समाज (प्रयास) ही एक मोठी संघटना असून तिचे हित जोपासून समाज उपयोगी कार्य करुन समाजातील दीन-दुबळ््यांची सेवा करावी.
जैन कलार समाजाचा मेळावा : नीळकंठ रणदिवे यांचे प्रतिपादन
भंडारा : जैन कलार समाज (प्रयास) ही एक मोठी संघटना असून तिचे हित जोपासून समाज उपयोगी कार्य करुन समाजातील दीन-दुबळ््यांची सेवा करावी. समाज संघटित तथा बळकट होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी नीळकंठ रणदिवे यांनी केले.
भंडारा येथे आयोजित जैन कलार समाजाचा वर-वधू परिचय मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ते म्हणाले की, प्रयासने उभारलेला वर-वधू परिचय हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम असून त्याचा निश्चितच समाजाला लाभ होईल. या प्रसंगी नागपूर प्रयासचे अध्यक्ष अनिल अहिरकर, किरण गोसेवाडे, कृष्णा घाटबांधे, चंद्रपूर जि.प. चे माजी अध्यक्ष सतिष वारजुरकर, मधुकर लिचडे, बाळकृष्ण घाटबांधे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी पालांदुरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यामध्ये समाजातील २०० वर-वधूची नोंद झाली असून मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अल्पोहाराचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा प्रयासचे अध्यक्ष निकेत क्षीरसागर यांनी केले असून संचालन स्वप्नील समर्थ, ललित घाटबांधे, ऋतुजा खेडीकर तर आभार राजु डोर्लीकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी निकेत क्षीरसागर, राजेंद्र बन्सोड, अनुप भांडारकर, राजु डोर्लीकर, आशिष रणदिवे, अतुल खोब्रागडे, विलास मुरकुटे, अविनाश आदमने, हितेश खोब्रागडे, ललित घाटबांधे, शैलेश हरडे, प्रकाश मुरकुटे, रमेश खोब्रागडे, सुनिल डवले, विलास बन्सोड, शरद भांडारकर, हरडे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)