जमिनीची काळजी घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:09 AM2017-12-07T00:09:24+5:302017-12-07T00:09:47+5:30
प्रत्येक शेतकऱ्यान पुढव्या पिढीकरिता जमिनीची योग्य काळजी घेतलीच पाहिजे अन्यथा पुढवी पिढी आम्हाला माफ करणार नाही,...
आॅनलाईन लोकमत
लाखनी : प्रत्येक शेतकऱ्यान पुढव्या पिढीकरिता जमिनीची योग्य काळजी घेतलीच पाहिजे अन्यथा पुढवी पिढी आम्हाला माफ करणार नाही, जमिनीला व पिकाला कशाची गरज आहे हे पाहण्याकरिता शेतातील माती परिक्षण प्रयोगशाळेत तपासलीच पाहिजे. रासायनिक खताचा अती वापरामुळे जमिनीची पोत खराब होत चाली आहे. याकरिता काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आ. बाळा काशिवार यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा व जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने लाखोरी येथे जागतिक मृदा दिवस व जमिन आरोग्य पत्रिका विवरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी के.बी. तरकसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, आ. बाळा काशीवार प्रमुख अतिथी अर्चना मोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले, सरीता कानतोडे, सरपंच अंजिरा गणवीर, मार्गदर्शक एम.व्ही. मुºहेकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा पी.पी. गिदमारे उपस्थित होते.
मातीत वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू असतात माती टिकली पाहिजे शेतीव्यवसाय नफ्यात करण्यासाठी शेती बरोबरच इतर पुरक व्यवसाय शेतकऱ्यांनी पशुपालन करून शेणखताचा वापर करून जमिनीचे संवर्धन केले पाहिजे, असे ज्ञानेश्वर रहांगडाले यांनी म्हटले. या जिल्ह्यात सेंद्रीय पदार्थाची कमतरता आहे.
त्याकरिता बंदिस्त गोठ्यात पशुपालन करून शेणखत जास्त प्रमाणात मिळविता येईल पिकाकरिता जेवणातील ताटाप्रमाणे वेगवेगळे अन्नघटक मिळाले पाहिजे त्याकरिता सर्वांनी माती नमुना तपासून घ्यावेत असे आवाहन त्यांनी अध्यक्षपदावरून बोलताना तरकसे यांनी केले.
प्रास्ताविक एम.व्ही. मुºहेकर यांनी तर आभार एम.आर. कळाम यांनी व संचालन वृषाली देशमुख यांनी केली.