देशाला गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज!

By Admin | Published: March 9, 2017 12:37 AM2017-03-09T00:37:28+5:302017-03-09T00:37:28+5:30

गांधीजी हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी मांडलेल्या लोकशाही संकल्पनेला आध्यात्मिकतेची बैठक होती.

The need for the values ​​of Gandhiji's moral democracy! | देशाला गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज!

देशाला गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज!

googlenewsNext

एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र : वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : गांधीजी हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी मांडलेल्या लोकशाही संकल्पनेला आध्यात्मिकतेची बैठक होती. त्यांना पश्चिमात्याची लोकशाहीची संकल्पना मान्य नव्हती, तर तळागाळातील माणसासोबतच उच्चवर्गीय माणसालादेखील समाज संधी प्राप्त होणे म्हणजेच लोकशाही. याकरिता गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज आहे, असे प्रतिपादन उद्घाटक व बीजभाषक डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप जवाहरनगर येथील युजीसी दिल्लीद्वारा पुरस्कृत महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारे ‘गांधी विचारधारा आणि भारतीय लोकशाही मुल्यव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटकीय भाषणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा बोलत होते. अध्यक्षस्थानी रातुमचे माजी विद्वत परिषद सदस्य डॉ. जी.डी. टेंभरे हे होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता आनंद मिश्रा, माजी प्राचार्य ए.एस. उखलकर, रायपूर विश्वविद्यालयाचे भाषा अध्ययन प्रमुख डॉ. व्ही.एन. दुबे उपस्थित होते.
आनंद मिश्रा म्हणाले गांधीजी अहिंसेरूपी क्रांतीचे विचारसरणीचे विचारक होते. उपभोग व आवश्यकता यांची तुलनात्मक उत्पादन करण्याची गरज आहे. विकास कशासाठी हा शोध घेण्याची गरज आहे. याकरीता गांधीजींच्या संकल्पनेतील लोकशाही द्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करावी, डॉ. व्ही. दुबे म्हणाले शिक्षण हे श्रमावर आधारित असावा. ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे धाव घेत आहे. याकडे अर्थव्यवस्थाकारांनी विचारात घेवून गांधी विचारधारा रूजवावी व गावाचा विकास साधावा. अध्यक्षीय भाषणात डॉ. जी.डी. टेंभरे म्हणाले गांधीजीच्या संकल्पनेतील भारत घडविण्यासाठी शेवटच्या माणसाचे विकास वाढावा यासाठी गांधीजींच्या आदर्श तत्वाचे पालन करावे. राष्ट्रीय चर्चासत्राच्या प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. अशोक काळे हे होते.
जे.एम. पटेल महाविद्यालयाचे डॉ. सुमन देशपांडे यांनी राष्ट्रीय एकात्मता एवं महात्मा गांधी व गांधी रिसर्च फाऊंडेशन जैन हिल्स जळगावचे बी.आर. बोबडे यांनी महात्मा गांधी का राजकीय तत्वज्ञान शोधनिबंध वाचन केले. संचालन डॉ. सुरेंद्र पवार यांनी केले. आभार डॉ. साधना वाघाडे यांनी मानले. दुपारनंतर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष पं. रविशंकर विश्वविद्यालय रायपूरचे भाषा व साहित्य अध्ययन विभाग प्रमुख डॉ. व्ही. दुबे होते.
डॉ. मधुलता व्यास व डॉ. उमावती पवार यांनी महात्मा गांधीजी का धार्मिक मानवतावाद शोध निबंध वाचन केले. संचालन डॉ. मुकूंद मेश्राम मौदा यांनी केले. आभार डॉ. राम चौधरी यांनी मानले. देशभरातील ८० प्राध्यापक उपस्थिती संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी यांनी केले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. आभार कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्रप्रसाद पटले यांनी मानले. यशस्वितेसाठी महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: The need for the values ​​of Gandhiji's moral democracy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.