बुद्ध व आंबेडकरांच्या विचारांची जगाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:46 AM2019-05-20T00:46:06+5:302019-05-20T00:46:34+5:30
शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शिल, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शिल, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली. या दोन्ही महामानवांच्या विचारांची गरज जगाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते यांनी केले.
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या छताच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला आदिशक्ती दुग्ध उत्पादक सहकारी संस्था टेकेपारच्या अध्यक्ष भुवनेश्वरी कायते होत्या. अतिथी म्हणून सरपंच विजय वासनिक, उपसरपंच सुरेश उईके, ग्रामसेवक चेटुले, छाया वाहाने, प्रियंका टेंभुर्णे व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
भूवनेश्वरी कायते यांनी भीमसैनिकांनी संघटीत होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक विचारांचा प्रसार करावा असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित अतिथींनी तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अमरदीप बोरकर यांनी तर, आभार प्रदर्शन बाबुलाल वासनिक, डॉ.नरेश साखरे यांनी केले. कार्यक्रमासाठी मारोती करवाडे, निवांत वासनिक, अमरदीप बोरकर, दिलीप साखरे, धनश्री रामटेके, अविनाश बोरकर, बित्सोक साखरे, दीपक भोयर, नंदकुमार साखरे, शशीकांत वाहने, मनोज वासनिक, विनोद बोरकर, सुदर्शन वासनिक, संगीता बोरकर, अबोली वाहने, ज्योती नंदेश्वर, प्रीती मेश्राम, रसिका करवाडे, कलाबाई बोरकर, सुलोचना बोरकर, अश्विनी बोरकर, शिल्पा कांबळे, शुद्धमता बोरकर, वर्षा बडोले, शिला साखरे, निर्मला वासनिक, यशोधरा वासनिक, रमाबाई दिनकर, वच्छला साखरे, प्रियंका वासनिक, अनन्या वाहने, दर्शना मेश्राम, नितेश दिनकर, जितेंद्र वासनिक, फुलचंद वासनिक, मयूर रामटेके, सुशील वासनिक यांच्यासह पंचशील बौद्ध विहाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.