नेहा उईके आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी

By Admin | Published: August 25, 2016 12:27 AM2016-08-25T00:27:59+5:302016-08-25T00:27:59+5:30

खापा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनी नेहा उईके हिने गळफास लावून आत्महत्या केली.

Neha Uike's demand for CID inquiry into suicide case | नेहा उईके आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी

नेहा उईके आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी

googlenewsNext

तुमसर : खापा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनी नेहा उईके हिने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारला तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी यांनी कारली येथे तिच्या कुटुंबीयांना ७५ हजारांची सानुग्रह मदत दिली. नेहा ही आईवडीलांना एकुलती होती. दरम्यान, आमदार चरण वाघमारे यांनी मंगळवारला आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर चौकशीचे निर्देश दिले. याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आदिवासी संघटनेने केली आहे.
शासकीय आश्रमशाळा खापा येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली ही आठव्या वर्गात शिकत होती. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास पंख्याला गळफास लावून वसतिगृहात आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या विद्यार्थिनीचे लक्ष गेल्याने तिने आरडाओरड केली. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले. ती बेशुद्ध होती. नागपूर येथे उपचारादरम्यान तिचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे मुख्याध्यापक प्रभाकर चोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारली येथे नेहाची आई अनिता व वडील हनेश उईके यांना प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांनी ७५ हजाराचे सानुग्रह आर्थिक मदतीचा धनादेश दिला. यावेळी आदिवासी विकास आघाडीचे माजी जि.प. सदस्य अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, प्रभा पेंदाम, अनिल टेकाम, कैलास गजाम, सूर्यकांत उईके, विनोद खंडाते, शालीक भलावी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

खापा शासकीय शाळेतील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण गंभीर आहे. मुख्याध्यापकाने सांगितलेल्या माहितीत तथ्य दिसत नाही. मुलीचे आत्महत्येचे कारण वेगळे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे सीआयडी चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
- अशोक उईके, माजी जि.प. सदस्य.

Web Title: Neha Uike's demand for CID inquiry into suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.