नेरला उपसा सिंचनाचे पाणी आठ गावांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:04 PM2019-06-10T22:04:53+5:302019-06-10T22:05:10+5:30

पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही.

Nerala gets irrigation water from eight villages | नेरला उपसा सिंचनाचे पाणी आठ गावांना मिळेना

नेरला उपसा सिंचनाचे पाणी आठ गावांना मिळेना

Next
ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न कायम : खासदारांकडून अपेक्षा वाढल्या

विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही. आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील हिरवेगार पीक केवळ एका पाण्याअभावी अनेकदा गेले. परंतु हा दाहक प्रश्नाला आजपावेतो कुणीही वाचा फोडली नाही. त्यामुळे याकडे नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांनी तरी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
त्या आठ गावातील शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी आणि खरीप हंगामात वेळेवर पाणी शेतीला मिळावे, यासाठी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी खासदार नाना पटोले, माजी सरपंच सुरेंद्र आयतुलवार, तिर्री, मोहन घोगरे सरपंच कलेवाडा व संबंधित विभाग अधिकारी यांची याविषयासंबंधी चर्चा बैठक अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गतवर्षी पार पडली. त्यात सकारात्मक चर्चाही झाली होती. परंतु त्यानंतर पाणी कुठे मुरले हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
त्या आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला जर पाणी पाहिजे असल्यास मिनी लिफ्टद्वारे बॅक वॉटरचे उपसा करून तो कलेवाडा येथील मामा तलाव गट क्रमांक ६० तथा कमकाझरी मधील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव या दोन्ही तलावात पाणी पोहचले तरच, या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळू शकते. त्या पाण्याचा उपयोग पहेला ते गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यातील पाण्याद्वारे होऊ शकते असा अंदाज माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी वर्तविला आहे. आता संबंधित विभागाद्वारे याचा अभ्यास करून या गावातील शेतकºयांना पाणी मिळेल अशी आशा अद्यापही धुसर आहे. मागील काळात जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी सिंचनासाठी प्रयत्न केले असले तरी त्यांच्या हाताला यश आले नाही. परंतु आता नवनियुक्त खासदार सुनील मेंढे याकछे लक्ष देतील का? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसेल तर त्यांनी शेती करायची कशी. त्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.

तिर्री परिसरातील गावांमधील शेतकरी याविषयी संतापलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-सुरेंद्र आयतुलवार, माजी उपसरपंच, तिर्री.
पहेला गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यामध्ये गोसे धरणाच्या पाण्यातून मीनी लिफ्ट योजना सुरु केल्यास परिसरातील शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
-मोहन घोगरे, सरपंच, कलेवाडा

Web Title: Nerala gets irrigation water from eight villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.