नेरला उपसा सिंचनाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 10:11 PM2018-10-09T22:11:45+5:302018-10-09T22:12:32+5:30

नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० टक्के शेतजमीन सन २००० ला अधिग्रहीत करण्यात आली. परंतु अद्याप पुनर्वसन झालेले नाही परिणामी संतप्त झालेल्या नेरला ग्रामस्थांनी चक्क उपसा सिंचनाला कुलूप ठोकले.

Nerla locks up locks by locks | नेरला उपसा सिंचनाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

नेरला उपसा सिंचनाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्देग्रामस्थांनी उचलला आक्रमक पवित्रा : पुनर्वसन आधी करा-मगच धरणात पाणी भरा

विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० टक्के शेतजमीन सन २००० ला अधिग्रहीत करण्यात आली. परंतु अद्याप पुनर्वसन झालेले नाही परिणामी संतप्त झालेल्या नेरला ग्रामस्थांनी चक्क उपसा सिंचनाला कुलूप ठोकले.
नेरला उपसा सिंचनाला कुलूप ठोकण्याची माहिती वाºयासारखी परिसरात पसरताच हजारो शेतकºयांचे ठोके वाढले यात चुक शासनाची की नेतला ग्रामस्थांची? मागील काळात जेव्हा नेरला उपसा सिंचनाचे कामकाज संथगतीने होत होते. परंतु एकाच वेळेस निवडणूक जवळ येताच काम एवढ्या गतीने सुरु झाले की रात्रंदिवस काम चालले. निमित्त होते नेरला उपसा सिंचनाच्या उद्घाटनाचे. गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला असून नेरला ग्रामस्थांची अंदाजे २०० ते ३०० एकर शेतजमीन पाण्याखाली आली.
त्यामुळे लावलेले प्ीके गेलीच. परंतु पाणी गावाजवळ आल्याने मोठ्या प्रमाणात सरपटणाºया प्राण्यांचा हैदोस वाढला. त्यामुळे सुद्धा ग्रामस्थ चिंताजनक स्थितीत आहेत. नेरला ग्रामस्थांच्या मते गावठाणाचे अधिग्रहण करताना जाहीरनाम्याच्या दिवशी ग्रामपंचायत अभिलेखात नमूद असलेल्या एकुण १२३८ कुटुंबाचे रितसर पुनर्वसन करण्यात यावे, नेरला उपसा सिंचन करिता ज्यांच्या जमीनी गेल्या अशांना पॅकेज अंतर्गत पर्यायी जमीन व पुनर्वसन अनुदान द्यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन नेरला ग्रामस्थांनी दिले होते.
नेरला ग्रामस्थांनी या आधी आपल्या समस्या कित्येकदा शासनदरबारी मांडल्या. नागपूर, मुंबई, दिल्लीपर्यंत मोर्चात गेले प्रश्न मांडले. अनेक मोठमोठ्या संबंधित विभाग अधिकार तथा लोकप्रतिनिधीकडे पण उपयोग काहीच झाला नसल्याची शोकांतिका यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे आता पर्याय राहिला नसल्याचेही शब्दात व्यक्त केले.
लोकप्रतिनिधींना या नेरला गावाविषयीचे प्रश्न माहित नाही का? शासन तथा जिल्हा प्रशासन मग यांनाही माहित नाही का? नेरला ग्रामस्थांनी जे प्राप्त माहितीनुसार अड्याळ व परिसरातील शेतकरी याच नेरला उपसा सिंचनाच्या भरोश्यावर आहेत.
परंतु नेरला उपसा सिंचन बंद केल्याच्या माहितीमुळे हजारो शेतकºयांमध्ये धडकी भरली आहे. शेतीला पाण्याची गरज आहे. त्यात एका पाण्याने शेतपीक जावू शकते. त्यामुळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी व विभाग नेरला ग्रामवासीयांच्या कोणत्या मागण्या पूर्ण करतो याकडे हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

हा सर्व प्रकार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे होत आहे. गोसीखुर्द प्रकल्पात बाधीत झालेल्या शेतकऱ्यांचा विचार तात्काळ व्हायला पाहिजे.
-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार.
नेरला उपसा सिंचनाच्या उद्घाटन वेळीच ग्रामस्थांनी अटकाव, मोर्चा काढला असता परंतु त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन उद्घाटन केले होते.
-अनिल कोदाणे, सरपंच नेरला.
नेरला या गावाचा जेएमआर करून तात्काळ पुनर्वसन तथा नवीन गावठाण देण्यात यावा.
-संजय तळेकर, नेरला.
गावाचे सर्वेक्षण झाले त्यांची शेतजमीन गेली आहे. गावठाणबाधीत होत नसल्यामुळे स्वच्छा पुनर्वसन होणार. त्यासाठी कार्यकारी यंत्रणा पॅकेज सुद्धा देणार असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळाली.
-अभिमन्यू गोधवड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, भंडारा.

Web Title: Nerla locks up locks by locks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.