नूतन कन्याची ऋतूजा वाघाये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:01:05+5:30
जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या दहावीच्या निकालात भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतूजा जागेश्वर वाघाये ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४.४१ टक्के लागला असून १७ हजार ५६० विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात ७३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत. लाखनी येथील समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती किशोर वाघाये आणि पवनीच्या वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिनी आयुषी सुनील घावडे या दोघी ९८.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून आल्या आहेत. त्यांना बेस्ट आॅफ फाईव्हमध्ये ४९१ गुण मिळाले आहेत. तर तुमसर येथील शारदा विद्यालयाचा विद्यार्थी लौकीक योगेश पडोळे हा ९७.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय आला आहे.
जिल्ह्यातून १७ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी परीक्षासाठी फार्म भरले होते. त्यापैकी १७ हजार ५६० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत चार हजार ६१८, प्रथम श्रेणीत सात हजार ५७, द्वितीय श्रेणीत चार हजार ३८ आणि उत्तीर्ण श्रेणीत ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भंडारा जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ८ हजार ५३१ मुली आणि ९ हजार २९ मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार २३४ मुली म्हणजे ९६.५२ टक्के तर ८ हजार ३३४ मुले म्हणजे ९२.४१ टक्के उत्तीर्ण झालेत.
लाखनी तालुका जिल्ह्यात प्रथम
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी लाखनी तालुक्यातून उत्तीर्ण झालेत. या तालुक्यातून १७७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०५ आहे. लाखांदूर तालुका जिल्ह्यात द्वितीय स्थानी आला असून या तालुक्यातून १७४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.५९ आहे. भंडारा तालुक्यातून ३९५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७५३ म्हणजे ९४.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साकोली तालुक्यातून २४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२७२ म्हणजे ९४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मोहाडी तालुक्यातून २०२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८९४ म्हणजे ९३.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तुमसर तालुक्यातून ३२७८ विद्यार्थ्यांपैकी ३०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५९ टक्के आहे. तर पवनी तालुक्याचा जिल्ह्यात सर्वात कमी ९२.८१ टक्के निकाल लागला.