पारंपरिक लग्नपद्धतीत नवीन प्रथा होताहेत रूढ !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:54 PM2024-04-27T13:54:24+5:302024-04-27T13:57:34+5:30
अनेक प्रथांचे इव्हेंट झाल्याने पैशाची उधळपट्टी: अनावश्यक व खर्च टाळण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
किटाडी : आजकाल विवाह सोहळ्यामध्ये नवनवीन विधी उद्यास आल्या आहेत. त्यात नव्याने रूढ झालेली मेहंदी व हजारो रुपये खर्च हळदी समारंभात करून विशेष सजावट केली जाते. त्या दिवशी हिरवे- पिवळे कपडे (ड्रेसकोड) घालतात. पूर्वी मेहंदी व हळदी विधीची प्रथा ग्रामीण भागात कुठेही दिसून येत नव्हती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ग्रामीण भागात ही प्रथा झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.
पूर्वी मेहंदी व हळदी विधीच्या मागे कोणताही दिखावा नव्हता. उलट त्यामागे धार्मिक व शास्त्रीय तर्क होते. पूर्वी ग्रामीण भागात आजच्यासारखे साबण, शाम्पू, आणि इतर साधनेही नव्हती. ब्यूटी पार्लरही नव्हते. त्यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी आणि चेहरा मुलायम व चमकदार करण्यासाठी हळद, चंदन, मैदा आणि दुधापासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करून चेहरा व शरीर रगडून काढले जात होते. जेणेकरून, वधू-वर सुंदर दिसतील. पूर्वी या कामाची जबाबदारी महिलांची होती; पण आजकाल हळदीचा विधी बदललेला असून दिखाऊ आणि महाग झालेला आहे. समारंभात ड्रेसकोड घातले जातात.
वधू-वर किंवा परिवार फक्त यांचेच ड्रेसकोड नसतात, तर सोबतच मामा, मावशी, आत्या, बहिणी, जावई, मेहुणे, पाहुणे आदी गोतावळा यांचेसुद्धा वेगवेगळ्या फॅशनचे निरनिराळे कपडे असतात. सोबतच नृत्य व गीतांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. जुन्याकाळी वधू-वर कोणताही गाजावाजा न करता भक्कमपणे आपले जीवन आनंदाने सुरू करीत असत; परंतु आज दृढ हेतू व कृत्रिमता अधिक आहे. कृत्रिमतेत अडकून कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढवीत आहेत.
डीजेशिवाय होतच नाही
म्हटली म्हणजे त्यात बँड, धुमाल व डीजे पाहिजेच. त्याशिवाय वराच्या मित्रांना नाचण्याचा जोशच येत नाही. पैसेवाले सर्वच प्रकारचे वाद्य व वरातीची रोषणाई करून घेतात. हीच प्रथा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. गावात जरी वरात काढली जाणार असली, तरी त्यांनाही डीजे, बँड, धुमाल हवाच.
अनावश्यक खर्च करायला भाग पाडतात
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही वर-वधू पालकांकडे आग्रह धरून त्यांना अनावश्यक खर्च करायला भाग शहरात वरात काढायची
पाडतात. मुला-मुलींच्या इच्छेखातर पालकही आपले मन मारून त्यांची इच्छा पुरवीत आहेत. यासाठी मात्र त्यांना कर्ज काढावे लागले तरी चालेल, अशी स्थिती आहे. सध्याची युवा पिढी या अनाठाई खर्चाला बळी पडत आहे. त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या अशा नवीन रुजू होणाऱ्या प्रथा थांबविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा समाजात व्यक्त्त होत आहे.