चाचणीविना नवीन वीज मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:27 PM2018-09-22T22:27:34+5:302018-09-22T22:27:50+5:30
पुरवठादाराकडून नवीन ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर महाविरणला प्राप्त होतात. मात्र या मीटरची कोणतीही चाचणी न करता वीज ग्राहकाच्या घरी लावले जाते. परिणामी सदोश मिटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. महावितरणच्या या अजब प्रकारामुळे तुमसरमधील ग्राहकांची लुट होत आहे.
राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पुरवठादाराकडून नवीन ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर महाविरणला प्राप्त होतात. मात्र या मीटरची कोणतीही चाचणी न करता वीज ग्राहकाच्या घरी लावले जाते. परिणामी सदोश मिटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. महावितरणच्या या अजब प्रकारामुळे तुमसरमधील ग्राहकांची लुट होत आहे.
महावितरण कंपनीला एलएनटी या कंपनीकडून ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर पुरविण्यात आले. नवीन वीज मिटरची महावितरणने तपासणी करणे गरजेचे आहे. प्रयोगशाळा आणि कॉलिटी कंट्रोल आणि अन्य मापदंडाच्या चाचण्या करून त्या मीटरची सत्यता पडताळणी गरजेचे आहे. परंतु महावितरणने सर्व नियम धाब्यावर बसविले आहे.
पुरवठा दाराकडून मिळालेले मीटर थेट ग्राहकांना वितरित होत आहे. परिणामी काही वॅटचे बल्ब आणि ईलेक्ट्रॉनिक वस्तुचा प्रमाणात वापर असतानाही ग्राहकांना मोठे बिल येत असल्याची ओरड आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता नाव न सांगण्याच्या अटीवर एका सहायक अभियंता म्हणाला, आम्ही पुरवठाद्वाराकडून आलेले कोणतेही मीटर तपासत नाही. आमच्याकडे आले की थेट ज्या उपविभागाची मागणी आहे त्यांना पाठवून देतो. सील करण्यासाठी लागणारे साहित्यही देतो. संबंधित कर्मचारी नवीन मीटर बसवून देतो. परंतु पुरवठाधाराकडून आलेले वीज मीटर योग्य आहे की सदोश याची कोणतीही खातरजमा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यासर्व प्रकारामुळे वीज ग्राहकांना मात्र नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चाचणीविना लावलेले नवीन वीज मीटरमुळे ग्राहकांची पिळवूक होत असून याविरूद्ध आवाज उठविणार असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते ठाकचंद मुंगुसमारे यांनी सांगितले.